‘बोल्ड’ अ‍ॅक्ट्रेस नेहा पेंडसेनं उरकला ‘साखरपुडा’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री नेहा पेंडसेला काही दिवसांपूर्वीच अभिजीत खांडकेकरने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु अनेकांना प्रश्न पडला होता की, या शुभेच्छा नेमक्या कशासाठी आहेत. सध्या नेहाच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच इंस्टाग्रामवरून नेहाचा एका फोटो समोर आला आहे.

View this post on Instagram

❤️

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

View this post on Instagram

U have my ❤️ Milan

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

नेहाने शेअर केलला फोटो हा खूप रोमँटीक आहे. या फोटोत ती एका व्यक्तीसोबत दिसत आहे. परंतु ही व्यक्ती नेमकी कोण आहे मात्र अद्याप कोणालाही समजलेलं नाही. परंतु नेहाचा फोटो नीट पाहिला तर दिसत आहे की, नेहाने अंगठी घातली आहे. या फोटोला नेहाने खास कॅप्शन दिले आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने हार्टची इमोजी टाकली आहे. नेहाच्या या फोटोमुळेच तिने साखरपुडा केल्याची चर्चा सुरु आहे. नेहाने हा फोटो इटलीतील मिलान कॅथेड्रल चर्चबाहेर क्लिक केला आहे.

नेहाच्या या फोटोने सर्वच अवाक झाले आहेत. शिवाय तिच्यावर सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. सर्वांना माहीतच आहे की, अभिनेत्री श्रृती मराठे नेहाची किती खास फ्रेंड आहे. तिनेही या फोटोवर कमेंट केली आहे. श्रृतीने कमेंटमध्ये म्हटले आहे, “ओह माय गॉड” याशिवाय अनेकांनी तिला साखरपुड्याबद्दल विचारणा करत म्हटले आहे की, “तू खरंच साखरपुडा केला आहे का ?”

नेहाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, २० वर्षांपासून ती टीव्ही क्षेत्रात सक्रिय आहे. १९९५ मध्ये तिने दूरदर्शनवरील शो कॅप्टन हाऊस मध्ये बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर झी टीव्ही वरील हसरतें या शो ने नेहाला लोकप्रियता मिळाली. यानंतर नेहा बिग बॉस १२ मध्येही दिसली होती. परंतु काही आठवड्यातच ती शो मधून बाहेर झाली.

View this post on Instagram

Tell me your dream🖤

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

आरोग्यविषयक वृत्त –

 

Loading...
You might also like