अनुष्का शर्मा विराट कोहलीमुळे सोडत आहे अँक्टिंग ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा झिरो शाहरुखच्या चित्रपटानंतर सिनेमापासून दूर असल्याचेच दिसत आहे. तिने कोणताही नवीन प्रोजेक्ट साईन केल्याचेही दिसत नाही. त्यामुळे नुकत्याच तिच्या फिल्मी करिअरला घेऊन काही अफवा समोर येताना दिसत आहेत. समोर आलेल्या वृत्तांनुसार, अनुष्का शर्मा बॉलिवूड सोडण्याचा प्लॅन करत आहे. याला कारण म्हणजे विराट कोहली आहे. काही अफवांमध्ये तर ती प्रेगनंट असल्याचेही म्हटले जात आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, विराट कोहलीच्या सांगण्यावरूनच ती अँक्टिंग सोडण्याचं मन बनवत आहे. विराट कोहलीची अशी इच्छा आहे की अनुष्काने अधिकाधिक वेळ तिच्या फॅमिलीला द्यावा. राहिला विषय ती प्रेगनंट असण्याचा, तर अनुष्काने याआधीच तिची प्रेगनन्सी अफवा असल्याचं सांगितलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनुष्का शर्मा फिल्मी इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये कमी दिसत आहे. अनुष्का शक्यतो विराट कोहलीसोबत हॉलिडे एन्जॉय करताना किंवा मग क्रिकेट टूर्नामेंटमध्ये विराटचा हौसला वाढवताना दिसून येते.

अनुष्काने सध्या अँक्टिंगपासून ब्रेक घेतला आहे. कारण तिला पती विराट सोबत वेळ घालवायचा आहे. विराटचा हौसला वाढवत त्याला चिअर करायचं आहे. वर्ल्डकप देखील लवकरच सुरु होणार आहे. अनुष्काने अँक्टिंग सोडणे ही सध्या तरी अफवाच म्हणावी लागेल. अनुष्काने अँक्टिंगला ब्रेक दिला आहे की बाय बाय म्हटलं आहे हे वर्ल्ड कप नंतर समजेलच.

Loading...
You might also like