Coronavirus : ‘कोरोना’ग्रस्त आईनं स्तनपान केल्यानं बाळाला ‘व्हायरस’चा धोका असतो का ?, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना व्हायरसबाबत गरोदर आणि स्तनदा महिलांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. कोरोनाग्रस्त महिलेने आपल्या बाळाला स्तनपान केल्याने बाळाला व्हायरसचा धोका आहे का ? कोरोना व्हायरस असल्यास महिला आपल्या बाळाला आपले दूध पाजू शकते का ?, असेच काहीसे प्रश्न तुमच्या मनात असतील तर यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने उत्तर दिले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कोरोनाग्रस्त महिलेनं बाळाला स्तनपान केल्याने आतापर्यंत कोणताही धोका दिसलेला नाही. ज्या महिलांना आपल्या बाळाला स्तनपान करायचे आहे, त्यांनी मनात कोणतीही भीती न बाळगता स्तनपान करावे. मात्र खबरदारी अवश्य घ्यावी. असे स्पष्ट केले आहे.

कोरोनाग्रस्त महिलांनी बाळाला स्तनपान करताना काय काळजी घ्यावी ? आईने नेहमी मास्क घालून राहावे, शरीराच्या स्वच्छता राखावी. बाळाला स्पर्श करण्यापूर्वी हात पाणी आणि साबणाने स्वच्छ धुवावेत. बाळाला दूध दिल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. शिवाय गरोदर महिलेमुळे तिच्या गर्भातील बाळाला कोरोनाव्हायरस होण्याचा धोका नाही, हेदेखील याआधी स्पष्ट झालेले आहे.

नवजात बाळांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची प्रकरणे आल्यानंतर कोरोनाग्रस्त महिलेमुळे तिच्या बाळालाही व्हायरसचा धोका असतो का अशी भीती निर्माण झाली. मात्र अशी अद्याप कोणतीही प्रकरणे दिसली नसल्याचे सेंट्रल फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like