केसगळतीने परेशान आहात काय…? मग ‘हे’ कराच

पोलिसनामा ऑनलाईन टीम- केसांचा कोरडेपणा, निस्तेजपणा, कोंडा, फाटे फुटणे यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी केसांना नियमित तेल लावले पाहिजे. तेल लावल्याने धूळ, प्रदूषण यापासून केसांचे संरक्षण होते. तेलामुळे केस मजबूत होतात. त्यांचा फ्रिझीनेस कमी होतो आणि केस तुटण्याला आळा बसतो. एका हेअर फॉलिकलमधून १-६ वर्षे केस वाढू शकतात. जुने केस गळून नवीन येणे ही सातत्याने होणारी प्रक्रिया आहे.

केसांना तेल लावताना काही वेळ केसांना मसाज केला पाहिजे. प्रथमच तेल लावताना आणि मसाज करताना केस गळणे स्वाभाविक असते. मात्र, हे प्रमाण अधिक असल्यास तज्ज्ञांना दाखवावे. केसातील अतिरिक्त तेल व्यवस्थित निघून जाईपर्यंत केस स्वच्छ धुतले पाहिजे. केसात तेल राहिल्यास धूळ, धूर, इतर प्रदूषणजन्य घटक केसात चिकटून राहू शकतात. त्यामुळे स्काल्पजवळील पोर्स बुजतात आणि हेअर फॉलिकल्स ब्लॉक होतात. परिणामी केस गळू लागतात.

तेलकट स्काल्पमुळे केसांत कोंडा होतो व केस गळू लागतात. खूप तेल लावल्याने स्काल्पमधील नैसर्गिक तेलाशी त्याचे संतुलन साधले जात नाही. त्यामुळे केस कमकुवत होऊन अधिक खराब होऊ शकतात. केसांना मसाज करताना स्काल्पला हळुवार मसाज करावा. जोरजोरात मसाज केल्याने केस गळू लागतील. अधिक प्रमाणात तेल लावू नये. केसातील तेल पूर्णपणे निघून जाण्यासाठी केस स्वच्छ धुवावेत.