लहान मुलांच्या डोळ्यात काजळ घालण्यापूर्वी ‘ही’ घ्या काळजी, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – अर्भकाच्या डोळ्यात काजळ घालण्याची प्रथा खूप जुनी आहे. भारतीय संस्कृतीनुसार नजर लागू नये, यासाठी डोळ्यांत काजळ लावल जातं. भारतातील सर्व खेड्यांमध्ये, शहरे आणि महानगरांमध्ये ही प्रथा पाळली जाते. परंतु ती योग्य की अयोग्य असा प्रश्न पडतो. डोळे हा शरीराचा सर्वात नाजूक भाग आहे. त्यामुळे मुलाच्या डोळ्यात काजळ लावणे योग्य आहे का?

काजळ लावण्याचा प्रभाव
आजीच्या सल्ल्यानुसार काजळ हे रामबाण औषध आहे. जे बाळाला सर्व प्रकारच्या आजारांपासून आणि समस्यांपासून वाचवते.

काजळामुळे बालकाचे डोळे चमकदार आणि सुंदर दिसतात. परंतु डॉक्टरांच्या मते काजळ बाळासाठी हानिकारक आहे.

डॉक्टरांचे मत
काजळामुळे अर्भकाच्या डोळ्यांतून पाणी येण्याची तक्रार वाढू शकते. खाज सुटणे तसेच अलर्जी होऊ शकते. काजळ लावल्यानंतर डोळे व्यवस्थित स्वच्छ केले नाहीत तर संसर्ग होण्याची शक्यता असते.

अनेकदा ते डोळ्यांच्या काठावर जमा होते. डोळ्यांमधील धूळ आणि घाण या गोष्टींवर त्वरीत परिणाम करते. यामुळे दृष्टीवर परिणाम होतो.

काजळ असे लावा
जर डॉक्टरांच्या या गोष्टींशी सहमत असाल आणि तरीही मुलाचे डोळे काजळाने सजवायचे असतील तर सेंद्रिय काजळ वापरा. बाजारात उपलब्ध काजळाऐवजी घरात तयार केलेले काजळ वापरा किंवा चांगल्या कंपनीने बनविलेले काजळच खरेदी करावे. रोज रात्री बाळाच्या डोळ्यांतून काजळ काढा आणि हलके हाताने डोळे धुवा.