महाराष्ट्रात ‘राष्ट्रपती राजवट’ लागणार ? सरकार बनवण्यासाठी ‘हे’ 5 शेवटचे ‘पर्याय’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा काही सुटायचं नाव घेत नाही. शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला खरा परंतु पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ वाढवून मागितली मात्र राज्यपालांनी त्यांना अधिक वेळ देण्यास नकार दिला आणि तिसऱ्या क्रमांकावर जास्त उमेदवार निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले. राष्ट्रवादीला आज रात्री 8:30 वाजेपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे त्यानंतर मात्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल.

सत्ता स्थापनेसाठी हे आहेत पाच पर्याय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शिवसेना आणि काँग्रेस या दोनीही पक्षाच्या संमतीशिवाय सत्ता स्थापन करणे अवघड आहे कारण राष्ट्रवादीकडे बहुमताचा आकडा नाही. शिवसेनेला आपलाच मुख्यमंत्री करायचा असल्याने शिवसेना राष्ट्रवादीला पाठींबा देईल याची शक्यता कमी वाटते. अशात राष्ट्रवादी सत्ता स्थापनेचा निर्णय नाकारू शकते.

दुसरा पर्याय
राष्ट्रवादीने नकार दिला तर राज्यपाल काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देऊ शकतात अशावेळी राष्ट्रवादीने जरी पाठींबा दिला तरी काँग्रेस उघड उघडपणे शिवसेनेचा पाठींबा घेईलच याची खात्री नाही.

तीसरा पर्याय
सर्वांना विचारून झाल्यानंतर जर कोणीच सत्ता स्थापन केली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. मात्र जर नंतर काँग्रेसचा विचार बदलला तर आगामी काळात शिवसेना कधीही सत्ता स्थापनेचा दावा करू शकते.

चौथा पर्याय
बाकी सर्व जणांनी सत्ता स्थापनेसाठी नकार दिला तर कायदे तज्ञांच्या मते भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करू शकते.

पाचवा पर्याय
राष्ट्रपती राजवटीनंतर देखील जर राज्यपालांना असे वाटले की, पुन्हा एकदा कोणताच पक्ष सत्ता स्थापनेसाठी पुढाकार घ्यायला तयार नाही अशावेळी राज्यात पुन्हा विधानसभेच्या निवडणूका लागू शकतात.

Visit : Policenama.com