Malaika Arora 47 व्या वर्षी होणार मुलीची आई? रियलिटी शोमध्ये केला खुलासा

नवी दिल्ली : बॉलीवुड अ‍ॅक्ट्रेस, डान्सर आणि फिटनेस आयकॉन मलायका अरोरा सध्या डान्स रियलिटी शो ’सुपर डान्सर चॅप्टर 4’ मध्ये जज म्हणून दिसत आहे. मलायका आता 47 वर्षाची झाली आहे आणि 19 वर्षाचा मुलगा अरहान खानची आई आहे. परंतु आता 19 वर्षानंतर मलायका अरोरा एका मुलीची आई होण्याचे प्लॅनिंग करत आहे. या गोष्टीचा खुलासा तिने रियलिटी शोच्या मंचावर केला.

दत्तक घेणार आहे मुलगी
मागील आठवड्यात मलायकाद्वारे शिल्पा शेट्टीला काही एपीसोडसाठी रिप्लेस केले आहे. आता मलायकाला, या शो मध्ये भाग घेणार्‍या मुली खुप इम्प्रेस करत आहेत. यासाठी मलायकाने यापूर्वी सुद्धा इच्छा व्यक्त केली होती की, जर तिला सुद्धा एखादी मुलगी असती तर. परंतु आता तिने स्पर्धक अंशिका राजपूतचा डान्स पाहून मोठा खुला केला आहे.

पुन्हा आई होण्याबाबत सिरियस आहे मलायका
मलायकाने अंशिकाचे कौतूक करताना बोलता-बोलता एक मोठा खुलासा केला, तो हा आहे की, ती आई होण्याच्या विचारावर खुप सिरिसय आहे. मलायकाने हे सुद्धा सांगितले की, तिला सुद्धा एक मुलगी हवी आहे, कारण तिला एक मुलगा आहे. ती एक मुलाची आई आहे, परंतु तिला एक मुलगी हवी आहे, जिच्या सोबत ती आपला मेकअप, शूज आणि कपडे शेयर करू शकेल.

गीता कपूरने केली प्रार्थना
मलायकाच्या मनातील इच्छा समजल्यानंतर दुसरी जज गीता कपूर सुद्धा इमोशनल झाली. तिने मलायकासाठी प्रार्थना केली. म्हणाली, मलायकाला एक सुंदर मुलगी होऊ दे. मलायकाने हे ऐकून रिअ‍ॅक्शनमध्ये म्हटले, गीता तुझ्या तोंडात साखर पडो. मला मुलगी व्हावी किंवा मी मुलगी अडॉप्ट करण्याचा विचार करत आहे. माझी ही मनापासूनची इच्छा आहे.