Corona लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतर तुम्ही घराबाहेर पडू शकता? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्ययंत्रणांवर याचा मोठा ताण येत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार, लसीकरणाची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे. पण या लसींचे दोन्ही डोस घेऊनही अनेकजण कोरोनाबाधित झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतल्याने कोरोनापासून वाचता येऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. पण आता त्यावरुन संक्रामक रोगांचे विशेषज्ञ डॉ. नितीन शिंदे यांनी सांगितले, की ‘जागतिक आरोग्य एजन्सीचा सल्ला आहे की, ज्यांनी कोरोनाच्या दोन्ही लसी घेतल्या आणि जे रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत अशा लोकांना बाहेर पडण्याची परवानगी द्यावी. भारतात दुसरा डोस दिला जात आहे. तो 80 टक्के सुरक्षित आहे. अमेरिकेत मॉडर्नाची लस 90 टक्क्यांपेक्षा जास्त सुरक्षित आहे.

दरम्यान, ज्या लोकांनी कोरोना लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा लोकांना ऑफिसमध्ये येऊन काम करण्यास बोलावू शकतात. मात्र, ऑफिसमध्ये कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर त्यांना ऑक्सिजनची गरज पडणार नाही.

अमेरिकेत विनामास्क फिरण्यास परवानगी

भारतात झालेले लसीकरण जगातील इतर कोणत्याही देशात झालेले नाही. तरीही हे एकूण लोकसंख्येच्या 2.5 टक्के आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण झाले. येथे 1.72 टक्के लसीकरण झाले आहे. पण अमेरिकेत लसीकरणानंतर बाहेर पडण्यावर आणि विनामास्क फिरण्याची परवानगी आहे.