रणबीर कपूरसोबत अफेअरची चर्चा असलेली ‘ही’ पाकिस्तानी अभिनेत्री पु्न्हा एकदा चर्चेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारणही तसेच आहे ते म्हणदे तिचे लेटेस्ट रिलेशनशिप. रिपोर्टनुसार, माहिरा सध्या सलीम करीमला डेट करत आहे. दोघांनीही टर्कीमध्ये साखरपुडा केल्याचे समजत आहे. या दोघांचेही कुटुंबीय आणि जवळचे मित्र या कर्यक्रमाला उपस्थित होते.

सलीम आणि माहिरा यांचा एख फोटो समोर आला आहे. ज्यामुळे त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चेला अजूनच उधाण आले आहे. या फोटोमध्ये माहिराने सुंदर असा गाऊन घातल्याचे दिसत आहे. तर सलीमने टक्सीडो घातल्याचे दिसत आहे.

रिपोर्टनुसार, असंही म्हटलं जात आहे की, सलीम आणि माहिराचा हा फोटो त्याच पार्टीचा आहे ज्यात त्या दोघांनीही एकत्र डान्स केला होता. दरम्यान दोघांच्याही साखरपुड्याबाबत त्यांच्याकडून मात्र कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

तुम्हाला सांगू इच्छितो की, माहिराचे नाव याआधी रणबीर कपूर सोबत जोडले गेले आहे. त्यावेळी माहिरा चांगलीच चर्चेत राहिली होती. रणबीर आणि माहिरा यांना न्यायॉर्कमधील एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्मोकिंग करताना स्पॉट गेलं होतं तेव्हा दोघांच्या नावाची खूपच चर्चा झाली होती. या फोटो मुळे माहिराला चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं.

माहिरा ने शाहरुख खान सोबत फिल्म रईसमधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या सिनेमातील माहिराच्या अभिनयाला चांगलीच दाद मिळाल्याचे दिसून आले.