OMG…! मला अशा अवतारात पाहून माझे वडील मला मारून टाकतील : जान्हवी कपूर 

मुंबई : वृत्तसांस्था – दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिची कन्या जान्हवी कपूर ने ‘धडक’ या सिनेमातून डेब्यू केला. धडक मध्ये दिसणाऱ्या सुंदर लांब केसांच्या जान्हवी मध्ये आता खूप  बदल झाला आहे. याच महिन्यात प्रसिद्ध होणाऱ्या एका मॅगझीन करिता जान्हवी कपूरने नवा लूक केला आहे तिचा हा नवा लूक पाहून तुमच्या देखील भुवया उंचावतील यात शंका नाही. कारण या मॅगझिनसाठी तिने आपलया  लांबसडक केसांना कात्री लावली आहे. या मॅगझीन शूटचे काही फोटो समोर आले आहेत. याशिवाय तिचा एक व्हिडीओ देखील प्रसिद्ध झाला आहे.

मला असे पाहिले तर माझे वडील मला मारून टाकतील 
जान्हवी कपूर चा हा नवा लुक आऊट झाला आहे  या नव्या लुक मध्ये जान्हवी खुपच  वेगळी दिसते आहे. तिच्या एका प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओत ती म्हणते ” हाय मी जान्हवी कपूर , मी माझ्या आयुष्यातील पहिले कॉस्मोपॉलिटियन मॅगझीन साठी शूट करते आहे , या शूट साठी मी खूप उत्सुक आहे. या शूट साठी मी माझे लांब केस कापले आहेत. या लुक मध्ये मला माझ्या वडिलांनी पाहिले तर ते मला मारून टाकतील, पण मी हे शूट केले आहे. “असे जान्हवी तिच्या नव्या लुक बाबत गमतीने म्हणते आहे. तिचा हा व्हडिओ व्हायरल होत आहे.

काय आहेत जान्हवीच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया 
– एका यूजरने लिहिले, ‘साफ खोटं बोलतेय, तू केस कापू शकत नाहीस, विग लावला आहे.’ एका यूजरने लिहिले, ‘हा विगच आहे.’
– एकाने कमेंट केली, ‘कालच जान्हवीचा एअरपोर्टवरचा फोटो बघितला, त्यात हेअरकट दिसला नाही.’ एकाने जान्हवीला म्हटले, ‘प्लीज सांग हा विगच आहे आणि तू हेअरकट केलेला नाहीस.’
– काही सोशल मीडिया यूजर्सना जान्हवीचा हा लूक मुळीच पसंत पडलेला नाही. काहींनी तिच्या या लूकला वियर्ड तर काहींनी वर्स्ट लिहिले.
धडकच्या यशानंतर जान्हवी आता आगामी चित्रपट IAF पायलट गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकवर आधारित असून यात ती लीड रोल साकारणार आहे. हा चित्रपट २०१९ मध्ये रिलीज होईल. गुंजन या कारगिल युद्धातील पहिल्या भारतीय महिला आयएएफ पायलट अधिकारी होत्या. याबरोबरच जान्हवी कपूर करण जोहरच्या ‘तख्त’ चित्रपटात दिसणार आहे.
Loading...
You might also like