सपना चौधरी इलेक्शन प्रकरणाला भलताच ट्विस्ट ; आता ‘या’ पक्षात करणार प्रवेश ?

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – हरियाणवी डान्सर सपना चौधरी ही काँग्रेस पक्षातून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरु असताना तिने रविवारी या गोष्टीवरून ‘यु टर्न’ घेतला. तिने आपण काँग्रेसमधून निवडणूकीच्या रींगणात नाही असे स्पष्ट केले आहे. याशिवाय काँग्रेसकडून दिले जाणारे वृत्त देखील खोटे असल्याचे तिने संगितले. पण आता या सपना चौधरी इलेक्शन प्रकरणाला भलताच ट्विस्ट मिळाला आहे. कारण आता सपना चौधरी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. एका फोटोवरून या चर्चांना उधाण आले आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या व्हायरल झालेल्या फोटोत भाजप दिल्ली अध्यक्ष मनोज तिवारी यांनी सपनाची भेट घेतल्याचं दिसत आहे. या वृत्तात मनोज तिवारी यांनीही सपनाच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. सपनाने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या अफवेवरही नाराजी व्यक्त केल्याचं तिवारी यांनी सांगितलं. सपनाने आपल्याला जेव्हा कुठे प्रवेश घ्यायचा असेल तेव्हा मी समोरून सांगेन, असंही म्हटल्याचं तिवारी यांचं म्हणणं आहे. पुढे जे होईल, ते आम्ही तुम्हाला सांगूच, भाजप नेहमीच चांगल्या बातमीसाठी काम करतो, असंही तिवारी म्हणाले आहेत. त्यामुळे सपना कदाचित भाजपमध्येही प्रवेश करू शकते, असा कयास लावला जात आहे.

कोण आहे सपना चौधरी

सपना चौधरी ही हरियाणामधील प्रसिद्ध स्टेज डान्सर आहे. तिची अनेक गाणी प्रसिद्ध आहेत. ‘तेरी अखियोंका काजल’ हे हरियाणवी भाषेतले गाणे हे खूप प्रसिद्ध झाले होते. अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमधून ती परफॉर्म करते. बिग बॉसच्या निमित्ताने ती घराघरात पोहोचली. बिग बॉस या मालिकेनंतर सपना चौधरी देशभर प्रसिद्धीच्या झोतात आली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like