आलियाचा एक्स बॉयफ्रेंड पुन्हा प्रेमात

मुंबई : वृत्तसंस्था – आलिया भटचा एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा प्रेमात पडला आहे. ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आलिया भट्ट-सिद्धार्थ मल्होत्राची जोडी अफेअर आणि ब्रेकअपमुळे चांगलीच चर्चेत राहिली.  आता आलिया रणबीर कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा चालू असतानाच सिद्धार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारिया यांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली आहे. ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ मध्ये भूमिका साकारणारी तारा सुतारिया सिद्धार्थ मल्होत्रापेक्षा अकरा वर्षांनी लहान आहे.

सिद्धार्थ हा माझा क्रश आहे, असं ताराने याआधी एका मुलाखतीत सांगितलं होतं. तारा आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करत असून अनेकदा बाहेर एकत्र फिरायलासुद्धा जात आहेत. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ मध्ये तारा टायगर श्रॉफ आणि अनन्या पांडेसोबत झळकणार आहे.

Tara-Sutaria

तारा व सिद्धार्थ नुकतेच एकत्र दिसले. वरळी येथील एका मॉलमध्ये जाताना त्यांना पाहिले. ते दोघे अमिताभ बच्चन व तापसी पन्नू यांचा बदला चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. तारा सुतारियाने टायगर श्रॉफ व अनन्या पांडेसोबत करण जोहरच्या कॉफी विद करण शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये टायगर श्रॉफने इशारा केला होता की तारा स्टुडंट ऑफ द ईयर चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत आहे. या वृत्ताला अद्याप सिद्धार्थ किंवा ताराने दुजोरा दिलेला नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us