सोशल मीडियाचा मेंटल हेल्थवर होतोय वाईट परिणाम, ‘ही’ 4 कारणे आणि सेफ्टी टिप्स करतील तुमची मदत

जास्त सोशल मीडियाचा वापर करण्याने मानसिक अरोग्य सुद्धा प्रभावित होऊ शकते. सध्या सोशल मीडिया निगेटिव्हिटी आणि इनसिक्युरिटीने भरलेला आहे. अनेक अभ्यासांमधून हे समोर आले आहे की, याचा जास्त वापर केल्याने एंग्जायटी आणि डिप्रेशनचा स्तर मोठ्या पातळीपर्यंत वाढू शकतो. सोशल मीडिया वर 4 प्रकारच्या गोष्टी काम करत असतात, ज्या व्यक्तीची स्ट्रेस लेव्हल वाढवू शकतात, हे 4 पॉईंट आणि उपयोगी टिप्स जाणून घेवूयात…

1. हायलायटेड होणे
सोशल मीडियावर लोकांना या गोष्टीने असुरक्षित वाटू लागते की, ते इतरांपेक्षा कमी हायलाईट का होत आहेत. ते सोशल मीडियावरील आपले मित्र, नातेवाईक आणि अगदी अनोळखी व्यक्तींशी आपली तुलना करू लागतात, आणि याच कारणामुळे मेंटल हेल्थ प्रभावित होते.

2. सोशल करन्सी म्हणजे लाईक्स आणि कमेंट्स
सोशल मीडिया वर लोक लाईक्स आणि कमेंट्सबाबत सुद्धा खुप अटेंटिव्ह असतात. हे लोक समजतात की, सोशल मीडियावर मिळणारे लाईक्स आणि कमेंट त्यांच्या जीवनातील योग्य किंवा अयोग्य सांगू शकतात. याशिवाय त्यांच्या पोस्टचे शेयरसुद्धा त्यांचे विचार पदर्शित करू शकतात. या कारणामुळे सुद्धा मेंटल प्रेशरमधून काही लोक जाऊ शकतात.

3. फोमो (फियर ऑफ मिसिंग आऊट)
सोशल मीडियावर सर्वात जास्त भिती मागे राहण्याची आणि मिस होण्याची असते. काही लोक नेहमी या स्ट्रेसमध्ये राहतात की, त्यांनी एखादा ट्रेंडिंग टॉपिक मिस तर केला नाही ना. यामुळे त्यांच्या मेंटल हेल्थवर वाईट परिणाम होतो.

4. ऑनलाइन हॅरेसमेन्ट
अनेकदा लोकांची सोशल मीडियावर ऑनलाइन हॅरेसमेंट होते. सोशल मीडियावर लोकांच्या डार्क साईडवरून जास्त चर्चा होते. अशावेळी स्ट्रेस लेव्हल खुप वाढू शकते.

हे लक्षात ठेवा

1 सोशल मीडियावर त्याच गोष्टींना फॉलो करा ज्यांची तुम्हाला गरज आहे. इतर अनावश्यक गोष्टींकडे लक्ष देऊ नका.

2 मानसिक हेल्थसाठी चांगला डाएट म्हणजे चांगल्या गोष्टींची आवश्यकता असते. मनात चाललेल्या गोष्टींचा आरोग्यावर खुप परिणाम होत असतो.

3 एक चांगला ऑनलाइन एक्सप्रियन्ससुद्धा मेंटल हेल्थमध्ये सुधारणा करतो आणि एक मॉडल गुड बीहेवियर तयार करतो.

4 सोशल मीडिया नेहमीच मेंटल हेल्थवर वाईट परिणाम करत नाही. कधी-कधी हा दुखी करतो, तर कधी-कधी तुम्हाला खुप हसवतो सुद्धा.