सूर्य देखील लॉकडाऊनमध्ये, काय संपुर्ण पृथ्वीवर जमा होणार बर्फ ?

पोलीसनामा ऑनलाईन : पृथ्वीवर उर्जा देणाऱ्या सूर्याच्या तापमानात आजकाल कमतरता आहे. त्याच्या पृष्ठभागावर दिसणारे डाग नष्ट होत आहेत किंवा ते तयार होत नाहीयेत. यामुळे वैज्ञानिक अस्वस्थ आहेत. कारण त्यांना भीती आहे की, ही सूर्याकडून येणाऱ्या कोणत्याही मोठ्या सौर वादळापूर्वीची शांतता तर नाही. जर सूर्याचे तापमान कमी असेल तर बरेच देश बर्फात गोठू शकतात, अनेक ठिकाणी भूकंप आणि त्सुनामी येऊ शकते. अवेळी हवामान बदलामुळे पीक खराब होऊ शकते. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, सूर्यावर सोलर मिनिममची प्रक्रिया सुरू आहे. म्हणजेच सूर्य विश्रांती घेत आहे. काही तज्ज्ञ याला सूर्याचे रिसेशन आणि लॉकडाऊन असेही म्हणत आहेत. म्हणजेच, सूर्याच्या पृष्ठभागावर दिसणारे डाग घटने योग्य मानले जात नाही.

माहितीनुसार, 17 व्या आणि 18 व्या शतकात सूर्य अश्याच परिस्थतीत होता. ज्या कारणास्तव, युरोपमध्ये एक छोटासा हिमयुग आला होता. थेम्स नदी बर्फाने प्रचंड गोठली होती. पिके खराब झाली. आकाशातून वीज पडत होती. आश्चर्याची बाब म्हणजे 1816 साली जेव्हा जुलै महिन्यात सामान्यत: हवामान कोरडे व पावसाळी होते तेव्हा युरोपियन देशांमध्ये भयंकर हिमवृष्टी झाली.

दरम्यान, रॉयल अ‍ॅस्ट्रोनोमिकल सोसायटीने म्हटले आहे की, सूर्य दर 11 वर्षांनी असे करतो. अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासानेही ही एक नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे म्हटले आहे. घाबरून जाण्याची गरज नाही. कोणताही हिमयुग येणार नाही. दुसरीकडे, खनिजशास्त्रज्ञ डॉ टोनी फिलिप्स म्हणतात की, सोलर मिनिमम सुरू झाले आहे. ते खूप खोल आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर डाग तयार होत नाहीत. सूर्याचे चुंबकीय क्षेत्र कमकुवत झाले आहे, ज्यामुळे अतिरिक्त कॉस्मिक किरण सौर मंडळामध्ये येत आहेत. तसेच सौर मिनिमममुळे 1790 ते 1830 या काळात जन्मलेल्या डाल्टन मिनिममची स्थिती परत येऊ शकेल, अशी भीती नासाच्या वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. यामुळे तीव्र थंडी, खराब पीक , दुष्काळ आणि ज्वालामुखीचा उद्रेक होण्याचे प्रमाण वाढू शकते.

10 एप्रिल 1815 रोजी इंडोनेशियाच्या माउंट तंबोरा येथे स्फोट झाला. यात 71 हजार लोक मारले गेले. त्यानंतर, जुलै महिन्यात बर्‍याच ठिकाणी बर्फ पडला तेव्हा 1816 मध्ये त्याला ‘एटीन हंड्रेड अँड फ्रोज टू डेथ’ असे नाव देण्यात आले. 2020 मध्ये आतापर्यंत सूर्यामध्ये एकदाही सन स्पॉट दिसला नाही, जो यावेळी 76 टक्के आहे. 2019 मध्ये ते 77 टक्के होते. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या केपलर स्पेस टेलीस्कोपमधील डेटाचा अभ्यास केल्यानंतर मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी हे उघड केले आहे की, आपल्या आकाशगंगेतील सूर्यासारख्या असणाऱ्या तार्‍यांच्या तुलनेत सूर्याची चमक कमी पडत आहे.

शास्त्रज्ञांना अद्याप समजू शकलेले नाही कि, कि वादळापूर्वी शांतता आहे की नाही. सूर्य आणि इतर तारे यांचे वय, चमक आणि फिरणे यावर आधारित अभ्यास केला गेला आहे. गेल्या 9000 वर्षात त्याची चमक पाच पट कमी झाली आहे. 1610 पासून सूर्यावरील सन स्पॉट सतत कमी झाले आहेत. मागील वर्षी, सुमारे 264 दिवस सूर्यप्रकाशात एकही स्पॉट दिसला नाही. जेव्हा सूर्याच्या मध्यभागी तीव्र उष्णतेची लाट येते तेव्हा सन स्पॉट तयार होतात. यामुळे मोठा स्फोट होतो. अंतराळात सौर वादळ उठतात. टिमो रिनहोल्ड म्हणाले की जर आपण सूर्याच्या वयाची तुलना 9000 वर्षे केली तर ही खूपच कमी वेळ आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास सूर्य थकला आहे आणि त्याला थोड्या विश्रांतीची गरज आहे.