‘धडकन’मधील ‘देव’ची मुलगी आथियाला स्टार क्रिकेटर केएल राहूल करतोय ‘डेट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आथिया शेट्टी सध्या आपल्या अफेअरमुळे खूपच चर्चेमध्ये आहे. असे समजले आहे की, आथिया शेट्टी क्रिकेटर के एल राहुलला डेट करत आहे. दोघेही सध्या रिलेशनशिप आहे.

एका सोर्सने लिहले की, के एल राहुल कोणत्याच अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमध्ये नव्हता. पण आता त्याचे एका अभिनेत्रीशी नाव जोडले गेले आहे. सोर्सने दिलेल्या माहितीनूसार, राहुल आणि आथिया
एकमेकांच्या प्रेमात आहे. सध्या ते रिलेशनशिपविषयी सांगण्याचे वारंवार टाळतात.

राहुल आणि आथिया या दोघांची भेट एका मित्राद्वारे झाली होती. तिची कॉमन फ्रेंड आकांक्षा रंजनने आपल्या सोशल मिडिया अकाउंवर एक फोटोसुद्धा शेअर केला होता. त्या फोटोमध्ये आथिया फक्त के एल राहुल याच्यासोबत दिसून आली होती. हा फोटो तिने एप्रिल महिन्यात शेवटच्या आठवड्यात शेअर केला होता.

बॉलिवूड लाईफने माहिती दिल्यानूसार, जेव्हा आथियाला याबाबतीत विचारले गेले. तेव्हा तिने प्रत्येक प्रश्नावर नकार दिला. त्यावेळी के एल राहुल याबद्दल बोलू शकले नाहीत. खरेतर, विश्वचषक स्पर्धेमुळे के एल राहुल यांना संपर्क करणे कठीण आहे.

या आधी देखील केएल राहुल यांचे नाव अभिनेत्री सोनल चौहान आणि निधी अग्रवाल या अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. पण, दोन्ही अभिनेत्रींनी या गोष्टींना नकार दिला. निधी अग्रवाल यांनी चक्क केएल राहुल यांना भाऊ असल्याचे सांगितले होते.

आरोग्यविषयक वृत्त – 

दम्याच्या रुग्णांनी घ्यावी ‘ही’ काळजी, अन्यथा वाढू शकतो त्रास

लाल फळे आरोग्याला फायदेशीर, नियमित करा सेवन

ताकाच्या नियमित सेवनाने वाढते रोगप्रतिकारक शक्ति

डोळ्यांवरून समजू शकते; तुमचे आरोग्य कसे आहे