अजूनही आहे का आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफमध्ये वाद ? जवळच्या मैत्रिणीने केला ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमध्ये आपण बर्‍याचदा अभिनेत्रींमध्ये कॅटफाइट्सच्या कहाण्या ऐकत असतो. आतापर्यंत बर्‍याच सुंदर अभिनेत्रींमध्ये भांडणे झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्री आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफविषयी बातम्या येत आहेत. असे म्हटले जात आहे की, कॅटरिना आणि आलियामध्ये मतभेद सुरु झाले आहे. या दोघांमधील मतभेद होण्याचे कारण रणबीर कपूर असल्याचे सांगितले जात होते.

पण अलीकडेच या सर्व वृत्तांचे सत्य समोर आले आहे. खरं तर या दोघांच्या अगदी जवळच्या मैत्रिणीने हे रहस्य उघडकीस केले आहे आणि ती मैत्रिण म्हणजे इतर कोणी नाही तर त्यांची फिटनेस ट्रेनर आणि तज्ज्ञ यास्मीन करांचीवाला आहे. आता आपल्याला माहिती आहे की कॅटरिना आणि आलिया एकाच ठिकाणी फिटनेस क्लासेसला जातात. दोघांची फिटनेस ट्रेनर यास्मीन करांचीवाला आहे.

अलीकडेच यास्मीनने एका वृत्तसंस्थेशी बोलताना कॅटरिना आणि आलियामध्ये काय चालू आहे याबद्दल सांगितले आहे. जेव्हा यास्मीन करांचीवाला हीला विचारले गेले की कॅटरिना आणि आलियामध्ये यापुढे मैत्री नाही का, तर यास्मीन म्हणाली की, ‘असं काही नाही’. यास्मीनचे म्हणणे आहे की कॅटरिना आणि आलिया अजूनही चांगल्या मैत्रिणी आहेत.

आलियाने रणबीर कपूरला डेट करण्यास सुरुवात केल्यापासून कॅटरिना आणि आलियाच्या मैत्रीमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांचे एकेवेळी सिरियस अफेअर होते. दोघे रिलेशनशिपमध्ये होते पण 2016 मध्ये त्यांचे नाते तुटले. कॅटरिनासोबतच्या ब्रेकअपनंतर रणबीर आता त्याची बेस्ट फ्रेंड आलिया भट्टला डेट करत आहे.

https://www.instagram.com/p/B6k8aKRhZe4/

‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात या दोघांनी काम करण्यास सुरुवात केल्यापासून रणबीर-आलियाच्या डेटिंगची बातम्या येऊ लागल्या. त्यांच्या लग्नाची बातमीही बर्‍याच काळापासून येत आहे. दोघांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या लग्नाची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.

https://www.instagram.com/p/B6f6A2QjJcG/