याच भारताचे स्वप्न आपण पहिले होते का : नसीरुद्दीन शाह 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाष्य करत नव्या भारता बद्दल काळजी व्यक्त केली आहे. व्यक्ती स्वातंत्र्याची कशा प्रकारे पाय मल्ली केली जात आहे या बद्दल भाष्य करत त्यांनी बदलत चाललेल्या राजकीय वातावरणाची चिंता व्यक्त केली आहे. आपण कोणत्या भारताचे स्वप्न निर्माण करायला निघालो होतो आणि आता कोणत्या भारतात येऊन पोहचलो आहे या बद्दल मला चिंता वाटते. तसेच मुलांच्या भविष्याबद्दल हि काळजी वाटते असे  नसीरुद्दीन शाह म्हणाले आहेत.

कलाकार, अभिनेते आणि पत्रकारांचा आवाज दाबला जात आहे या बद्दल हि मला खंत वाटते आहे. दोन मिनिटाच्या व्हिडीओ मध्ये नसीरुद्दीन शाह यांनी आजच्या परिस्थितीवर केलेले भाष्य आपणाला विचार करायला भाग पाडते आहे. त्यांनी संविधानाची निर्मिती झाली तेव्हा आपणा सर्वाना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय  मिळण्याची तरतूद करण्यात आली होती. या बाबीचे काय झाले असा हि सवाल आपल्या व्हिडीओमध्ये केला आहे.

आपल्या देशात प्रत्येकाच्या जीविताला संरक्षण दिले गेले पाहिजे तर आपल्या सर्वांच्या संपत्तीला हि संरक्षण दिले गेले पाहिजे. त्याच प्रमाणे गरिबांचे हि आपण रक्षण केले पाहिजे त्याच प्रमाणे गरिबी निवारणासाठी हि आपण उपाय योजिले पाहिजेत पण आता तसे होताना दिसत नाही असे नसीरुद्दीन शाह म्हणाले आहेत. तर देशाची सत्ता ज्या लोकांच्या हाती असते ते लोक आपले रक्षण करतात परंतु आज जो आपल्या हक्का बद्दल बोलतो आहे. त्यालाच जेल मध्ये टाकण्याचे काम सध्या सुरु आहे. अशी परिस्थिती विदारक बनत चालली आहे असे नसीरुद्दीन शाह यांनी म्हणले आहे.

धर्माच्या नावावर वितुष्टाच्या भिंती उभारल्या जाऊ लागल्या आहेत. द्वेष तिरस्काराचे वातावरण देशात पसरवले जाते आहे. तर खरे बोलणाऱ्याला सर्व वाटाच बंद करण्याचे काम सध्या केले जाते आहे. या सर्व गहन बाबींवर चर्चा करत  नसीरुद्दीन शाह यांनी आपण याच भारताचे स्वप्न पहिले होते का असा सवाल विचारला आहे. सध्या देशात श्रीमंतांचा आवाज बुलंद होत चालला असून गरिबांचे कोणाला पडले नसून गरीबाला पायदळी तुडवले जात आहे. जिथे एकता होती तिथेच आता अंधःकार पसरत चालला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.