‘क्वारंटाईन’मध्ये दिशा पाटनीसोबत ‘लॉकडाऊन’ आहे टायगर श्रॉफ ? बहिण कृष्णाचा मोठा ‘खुलासा’ !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ यांनी कधीच आपल्या नात्यावर खुलून बाष्य केलेलं नाही. दोघं एकमेकांचे मित्र असल्याचं सांगत असतात. लॉकडाऊनमध्ये अशी माहिती समोर आली की, दोघं एकत्र टाईम स्पेंड करत आहेत. यावर आता टायगरची बहिण कृष्णा श्रॉफनं भाष्य करत खुलासा केला आहे.

कृष्णानं त्यांच्या एकत्र राहण्याच्या बातमीचं खंडन केलं आहे. एका मुलाखतीत कृष्णा म्हणाली, “असं अजिबात नाही. दिशा आमच्यासोबत रहात नाही. आमच्या घराच्या शेजारीच ती राहते. त्यामुळं तिचं येणं जाणं सुरू असतं. आम्ही कधी बाहेर सामान आणण्यासाठीही जातो. टायगरमुळं आमचीही चांगील मैत्री झाली आहे.” असं तिनं सांगितलं.

यावेळी पुढे बोलताना कृष्णा म्हणाली, “टायगरला मिळून मिसळून राहण्यापेक्षा एकटं राहायला जास्त आवडतं. असं असूनही दोघं चांगले मित्र असतील तर याचा अर्थ दिशा खूप कूल आहे.” असं म्हणत तिनं टायगर आणि दिशा यांच्या बाँडिंगवर भाष्य केलं.

https://www.instagram.com/p/B-uGdO5B9-E/

टायगरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो बागी 3 मध्ये दिसला आहे. टायगर हॉलिवूड सिनेमा रैम्बोच्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे. टायगर 2014 साली आलेल्या हिरोपंती या सिनेमाच्या सिक्वलमध्ये म्हणजेच हिरोपंती 2 मध्येदेखील काम करताना दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/B-uG4zlhcfK/

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच ती मलंग सिनेमात दिसली होती. याशिवाय नुकत्याच रिलीज झालेल्या टायगर श्रॉफच्या बागी 3 सिनेमात दिशा आयटम नंबर करताना दिसली. लवकरच दिशा आगामी सिनेमा राधे : योर मोस्ट वॉन्टेड भाई या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती सलमान खानसोबत काम करणार आहे.

https://www.instagram.com/p/B-W6kD-h4iE/

https://www.instagram.com/p/B9ePpT6B6Pn/

https://www.instagram.com/p/B8BqBP3BDRe/

https://www.instagram.com/p/B73V-4VBxM5/

https://www.instagram.com/p/B7TPBPwBfzE/

https://www.instagram.com/p/B65huWwBb6z/