अभिनेत्री विद्या बालन प्रेग्नेंट ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने 2012 मध्ये सिद्धार्थ रॉय कपूरशी लग्न केले होते. दोघांचेही एक मजबूत नाते आहे. सगळ्यांनी प्रेरणा घेण्यासारखे हे कपल आहे. आता विद्या बालन प्रेग्नंट असल्याची बातमी चर्चेत आहे.

नुकतेच तिला स्पॉट केले गेले. तिचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री विद्या बालन ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये दिसून आली. यावर तिने डेनिम जॅकेट टीमअप केले होते. या व्हिडिओला पाहून ती प्रेग्नेट असल्याचा अंदाज लावला जात आहे. या व्हिडिओला पाहून एका चाहत्याने लिहले की, विद्या प्रेग्नेंट आहे का? दुसऱ्या चाहत्याने लिहले की, विद्या प्रेग्नेंट आहे की नाही हे येणारी वेळ सांगेल.

ही पहिलीवेळ नाही की, कोणत्या अभिनेत्रीचा प्रेग्नेंट होण्याचा अंदाज लावला जात आहे. याआधी देखील प्रियंका चोपड़ा, दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा आणि सोनम कपूर यांच्या प्रेग्नेंसीबद्दल चर्चा सुरु होती. कॅमेऱ्याच्या चुकीच्या अॅंगलमुळे असे वाटत होते की, या अभिनेत्री प्रेग्नेंट आहे.

विद्या बालनच्या कामाविषयी बोलायचे म्हणले तर विद्या बालन साउथ सुपरस्टार आणि राजनेता एनटीआरच्या बायोपिकमध्ये दिसून आली होती. विद्या याच्याव्यतिरिक्त चित्रपट ‘मिशन मंगल’ मध्ये दिसून येणार आहे. या चित्रपटामध्ये तापसी पन्नू आणि अक्षय कुमारसारखे कलाकार दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/BxxVFAVH8Ac/

‘मिशन मंगल’ चित्रपटाला जगन शक्तीने डायरेक्ट केला आहे. चित्रपटामध्ये अक्षय कुमार, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी, नित्या मेनन आणि कीर्ती कुल्हाडीसारखे कलाकार दिसणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त