होय ! ‘ही’ आहे पृथ्वीवरील सर्वात सुंदर महिला, हे आम्ही नाही विज्ञान सांगतंय !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Isabella Khair Hadid सुपर मॉडेल बेला हदीद पृथ्वीवरील सर्वात सुंदर महिला आहे. हे आमचं नाही तर सायन्सचं म्हणणं आहे. Golden Ratio of Beauty Phi Standards नुसार, वैज्ञानिकांनी पृथ्वीवरील सर्वात सुंदर महिलेचा शोध घेतला आहे. व्हिक्टोरिया सिक्रेट (Victorias Secret)ची मॉडेल बेला हदीदचं फेस शास्त्रज्ञांना त्या परफेक्शनच्या जवळ असल्याचं आढळलं आहे. The Golden Ratio of Beauty Phi सौंदर्याचं मोजमाप क्लासिक ग्रीक कॅल्क्युलेशनच्या आधारावर करते.

यात फेशियल प्रोपोर्शन म्हणजेच चेहऱ्याच्या बनावटीचं मोजमाप ग्रीक विद्वानांनी अवलंबलेल्या तंत्रावर अधारीत असते. यात सौंदर्य विज्ञानाच्या दृष्टीकोनातून मोजमाप करण्याचा प्रयत्न केला जातो. गोल्डन रेशोनुसार, 23 वर्षीय सुंदर मॉडेल बेलाचा चेहरा 94.35 टक्के परफेक्ट आहे. यात प्रसिद्ध अ‍ॅक्ट्रेस अंबर हर्ड (Amber Heard) तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिचा चेहरा 91.85 टक्के परफेक्ट आहे.

या सौंदर्यवतींच्या चेहऱ्याचं मोजमाप लंडनच्या नामवंत फेशियल कॉस्मेटीक सर्जन डॉ ज्युलियन डी सिल्वाने (Dr Julian De Silva) केलं आहे. पृथ्वीवरील सर्वात सुंदर महिलांची निवड करणाऱ्या ज्युलियन यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, फिजीकल परफेक्शनच्या सर्व पॅरामीटर्सनुसार केलेल्या मोजमापात बेला हदीद ही विजेता आहे. तिची हनुवटी 100 टक्के परफेक्शनच्या जवळ आहे. तिच्या हनुवटीला 99.7 टक्के स्कोर मिळाला आहे.”

Visit : policenama.com