उद्योगपती अंबानींची मुलगी ईशा आणि आनंद पिरामल यांच्या आलिशान बंगल्याचे फोटो व्हायरल

मुंबई : वृत्तसंस्था –  गेल्या वर्षी १२ सप्टेंबर रोजी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानी यांनी पिरामल समूहाचे चेअरमन अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्यासोबत लग्न केलं. या लग्नात बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी उपस्थिती दाखवली होती. हे लग्न अंबानी परिवारातील एकुलती एक मुलगी ईशा अंबानीचं होतं. त्यामुळे यासाठी वारेमाप खर्च करण्यात आला होता. लग्नानंतर ईशाने आपलं घर अँटिलिया सोडलं आणि आता ती आपल्या पतीसोबत नव्या आणि खूप अलिशान घरात राहणार आहे ज्याचे काही फोटो समोर आले आहेत.

https://www.instagram.com/p/BrXGTzLgIEg/

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचं हे नवीन घर खूपच सुंदर आहे. साऊथ मुंबईच्या वरळीमध्ये असणारं हे घर सध्या चर्चेचा विषय बनताना दिसत आहे. ‘गुलीटा’ असं या बंगल्याचं नाव ठेवण्यात आलं आहे. ईशाचा हा सी फेसिंग बंगला तिच्या सासऱ्यांनी २०१२ मध्ये खरेदी केला होता. ईशाच्या लग्नाआधीच या बंगल्याचे काम सुरु होते.
image.png

ईशा आणि आनंद यांना हा बंगला त्यांच्या वडिलांनी लग्नाची भेट म्हणून दिला आहे. आता हा बंगला पूर्णपणे तयार आहे. ५० हजार स्क्वेअर फीटमध्ये तयार करण्यात आलेल्या या बंगल्याची किंमत ४५० कोटी रुपये सांगितली जात आहे. घराच्या आतील भागाचे जे फोटो समोर आले आहेत ते पाहून तुम्ही नक्कीच हबकून जाल. सर्व सुख-सुविधांनी परिपूर्ण असे हे घर आहे. या घराच्या इंटेरिअरवरही विशेष काम करण्यात आले आहे.
image.pngहा बंगला एकूण ५ मजल्यांचा आहे. यात एक लॉन, तीन बेसमेंट, खुल्या हवेत स्विमिंग पूल आणि खूप साऱ्या खोल्या बनवण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर यात एक शानदार ग्लासवाला मुखवटाही बनवण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही बाहेरच्या सुंदर नजाऱ्याचा आनंद घेऊ शकता.
image.pngया घराचं डिझाईनही खूप हटके आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये तुम्ही घराचं डिझाईनही पाहू शकता. हा बंगला डायमंड थीमवर आधारीत आहे. ईशाच्या लग्नात बॉलिवूड कलाकारांपासून तर अनेक राजकीय पुढाऱ्यांनी तसेच क्रिडा क्षेत्रातील अनेक मंडळींनी उपस्थिती दर्शवली होती. सर्वात खास बाब होती ती म्हणजे हिलरी क्लिंटन यांची उपस्थिती.
image.png

आरोग्यविषयक वृत्त – 

दातांचे आरोग्य राखण्यासाठी ‘ही’ माहिती आहे खूप आवश्यक

तणावामुळे जुनी दुखणी होतात अधिक गुंतागुतीची

फॅमिली प्लनिंगसाठी हे ‘ वय ‘ योग्य

हाडांमधून वारंवार आवाज येणे हे भविष्यातील समस्यांचे लक्षण