ईशा आणि आकाश अंबानी यशस्वी युवा उद्योजकांच्या फॉर्च्यून ‘40 अंडर 40’ च्या लिस्टमध्ये

नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा आणि मुलगा आकाश अंबानीला फॉर्च्यूनच्या ‘40 अंडर 40’ च्या लिस्टमध्ये स्थान मिळाले आहे. या यादीत त्यांच्याशिवाय भारतातील एज्युटेक स्टार्टअप बायजसचे संस्थापक बायजू रवींद्रन आणि शाओमी इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर मनु जैन यांनाही स्थान मिळाले आहे. मनु यांनी यापूर्वी ई-कॉमर्स कंपनी जबोंगची स्थापना केली होती, जी फ्लिपकार्टला विकली आहे.

काय आहे ही लिस्ट
फॉर्च्यूनने फायनान्स, टेक्नॉलॉजी, हेल्थकेयर, पॉलिटिक्स, मीडिया आणि एन्टरटेन्मेंटच्या कॅटेगरीत 40 वर्षांच्या आत जगातील 40 प्रमुख उद्योजकांची फॉर्च्यूनने यादी जारी केली आहे. प्रत्येक कॅटेगरीत जगातील 40 लोकांना सहभागी केली आहे, ज्यांचे वय 40 पेक्षा कमी आहे. ईशा आणि आकाश अंबानी यांचे नाव टेक्नॉलॉजी कॅटेगरीत समाविष्ट आहे.

ईशा आणि आकाशचे कौतूक
फॉर्च्यूननुसार, त्यांनी जियोला पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. जियोमार्टला लाँच करण्यात आकाश आणि ईशा यांच्या भूमिकेचे सुद्धा फॉर्च्यूनने कौतूक केले आहे. मे महिन्यात रिलायन्सने जियोमार्टला लाँच केले होते. भारतात वेगाने वाढणार्‍या ई-कॉमर्स बाजारात रिलायन्स आता दिग्गद अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या दिग्गजांना आव्हान देत आहे.

न्यूज एजन्सी पीटीआयनुसार, फॉर्च्यूनने म्हटले आहे की, त्यांनी जगाला हे दाखवले आहे की, एक खुप यशस्वी ऑनलाइन एज्युकेशन कंपनी कशाप्रकारे शक्य आहे. फॉर्च्यूनने म्हटले की, त्यांना अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांपर्यंत आपल्या व्यवसायाचा विस्तार केला पाहिजे.

आकाश आणि ईशा दोघे मुकेश अंबानी यांची जुळी मुले आहेत या दोघांनीच फेसबुकसोबत 9.99% भागीदारीसाठी 5.7 अरब डॉलरची मेगा डील यशस्वीपणे पूर्ण केले. गूगल, क्वालकॉम आणि इंटेलसारख्या कंपन्यांना रिलायन्ससोबत जोडणे आणि त्यांच्याकडून गुंतवणूक प्राप्त करण्याचे काम सुद्धा याच लीडरशिपमध्ये पूर्ण झाले.

आकाशने ब्राऊन युनिव्हर्सिटीतून इकोनॉमिक्सची डिग्री घेतली आहे आणि 2014 मध्ये फॅमिली बिझनेस जॉईन केला. तर ईशाने 1 वर्षानंतर जियो जॉइन केले. ईशाने येल, स्टॅनफोर्ड सारख्या संस्थेत शिक्षण घेतले आहेत.