ईशा केसकरनं शेअर केला ‘बोल्ड’ बिकिनी लुक ! सोशलवर व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठी अभिनेत्री ईशा केसकर (Isha Keskar) सोशल मीडियावर कायमच ॲक्टीव असते. आपल्या लुकसाठी फेमस असणाऱ्या ईशानं आजवर तिचा हॉट अवतार देखील दाखवला आहे. आजवर तिनं बोल्ड फोटोंनीही अटेंशन घेतलं आहे. पुन्हा एकदा ईशा आपल्या बोल्ड आणि हॉट अवतारामुळं चर्चेत आली आहे.

ईशानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती प्रचंड हॉट दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं बोल्ड बिकिनी घातली आहे. ईशानं समुद्राच्या पाण्यात उभं राहून पोज दिली आहे ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे.

ईशाचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

ईशाच्या खासगी लाईफबद्दल बोलायचं झालं तर अभिनेता ऋषी सक्सेना सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्याच्यासोबतचे फोटोही तिनं आजवर अनेकदा सोशलवर शेअर केले आहेत.

ईशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकेत काम केलं आहे. या मालिकेत ती शनाया ची भूमिका साकारत होती जी प्रेक्षकांमध्ये खूपच फेमस आहे. 2013 साली आलेल्या वि आर ऑन होऊन जाऊ द्या या सिनेमातून तिनं आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या गर्लफ्रेंड सिनेमातही ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे. मंगलाष्टक वन्स मोअर या सिनेमातही तिनं काम केलं आहे. झी मराठीच्या जय मल्हार या मालिकेमुळं ईशाला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि ती घराघरात पोहोचली. या मालिकेतील तिची बानू ची भूमिका सर्वांनाच आवडते.