इशा – विक्रांतच्या संगीताचा रोमॅण्टिक डान्सचा व्हीडिओ पाहिलात का ?

मुंबई : वृत्तसंस्था – झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ ही मालिका वेगळ्या कथानकामुळे कमी कालावधीत लोकप्रिय झाली. त्यातील इशा आणि विक्रांत ही जोडीही तशीच चांगलीच लोकप्रिय झाली. नववर्षाच्या सुरुवातीलाच मालिकेत ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे.

https://twitter.com/zeemarathi/status/1081473685309911042

१३ जानेवारीला मालिकेत हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. तर ११ तारखेला मेहंदी आणि १२ तारखेला साखरपुडा होणार आहे. सध्या या मालिकेत लग्नाची गडबड पाहायला मिळत आहे. विक्रांत- इशाच्या संगीत सोहळ्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हीडिओमध्ये संगीत सोहळ्यात विक्रांत-इशा रोमॅण्टिक डान्स करताना दिसत आहेत. इशावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी विक्रांतने नेहमीच अनोखी पद्धत वापरली. त्यातच शांत स्वभावाचा विक्रांत आपल्या डान्समधून इशासाठी असलेलं प्रेम व्यक्त करत आहे.

विक्रांत आणि इशाच्या प्रेमासाठी घरचांचा विरोध होता. मात्र दोघांच्या प्रयत्नांमुळे घरच्यांनी त्यांच्या प्रेमाला होकार दिला. त्यानंतर नुकताच इशाचा ‘टीळा’ लावण्याचा कार्यक्रम म्हणजेच लग्न पक्क केल्याचा कार्यक्रम पार पडला.
दरम्यान, विक्रांत इशा यांनी लग्न विधींसाठी महाराष्ट्रातील भोर या ठिकाणाची निवड केली आहे. अखेर १३ जानेवारीला सायंकाळी सात वाजता हे लग्न पार पाडणार  आहे.