शाहिद कपूरच्या सांगण्यावरून ईशान खट्टरने नाकारला विशाल भारद्वाजचा चित्रपट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शाहिद कपूर चित्रपट कबीर सिंहच्या यशाचा उत्सव साजरा करत आहे आणि आता त्याने आपला छोटा भाऊ ईशान खट्टरला सोबत घ्यायचा निर्णय घेतला आहे. विशाल भारद्वाजच्या पुढील चित्रपटात काम करण्यापासून ईशान खट्टरने नकार दिला आहे. ईशानने या आधी अनेक चित्रपटांना नकार दिला आहे, त्यामध्ये एक चित्रपट करण जोहरचा होता. हिंदी चित्रपट धड़क पासून पदार्पण करणारा ईशान खट्टर या दिवसांमध्ये धडक चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे.

धर्मा प्रोडक्शन ईशान खट्टरला आपल्या टॅलेंट लिस्ट मध्ये ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. पण ईशान त्याच्या चित्रपटांचा निर्णय कोणाला ठरवू देऊ इच्छित नाही. त्यामुळे त्याने धर्मा प्रोडक्शनला बाय बाय सांगितले. विशाल भारद्वाज पण ईशानला सोबत घेऊन चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु मोठा भाऊ शाहिदच्या बोलण्यामुळे त्याने या चित्रपटापासून स्वतःला वेगळे केले आहे. या दिग्दर्शकाचे सलग ५ चित्रपट फ्लॉप झाले आहेत.

शाहिद कपूर सोबत कमीने, हैदर आणि रंगून चित्रपट बनवणारा विशाल भारद्वाज या वेळी ईशानसोबत चित्रपट करू इच्छित होता. परंतु, शाहिदने ईशानला एक्सपेरीमेंटल सिनेमा पासून दूर राहण्यास सांगितले आहे. शाहिद या दिवसांमध्ये अर्जुन रेड्डी नंतर तेलगू चित्रपटात हिंदी रीमेक करण्याचा विचार करत आहेत. यानंतर शाहिदकडे दोन हिरोंचा चित्रपट आला आहे. नीरजा चित्रपटातून मशहूर झालेला दिग्दर्शक राम माधवानी हा चित्रपट बनवणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शाहिद या चित्रपटात ईशानला आपल्या सोबत घेणार आहे आणि ईशानचा हा चित्रपट धडक नंतरचा पुढील चित्रपट असेल. राम माधवानीचा हा चित्रपट एक रोड थ्रिलर मूवी आहे. त्यामध्ये दोघे भाऊ बाइकर्सच्या रोल मध्ये दिसून येणार आहे.

व्यायामाचा आनंद वाढविण्यासाठी ही आहे ‘बेस्ट आयडिया’

‘किकबॉक्सिंग’ने घालवा राग आणि तणाव

त्वचेच्या बचावासाठी ‘वॉटर थेरपी’ ठरू शकते लाभदायक

परिवहन कर्मचा-यांचे ‘भीक मांगो’ आंदोलन

मागास वर्गीय विद्यार्थ्यांचा भोजन व निवासाचा खर्च शासन उचलणार