जावेद जाफरीचा मुलगा मीजानच्या बॉलिवूड डेब्यूबाबत ऋषी कपूर ‘असं’ म्हणतात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या मोठ्या कालावधीपासून कॅन्सर वरील उपचारामुळे दिग्गज अभिनेता ऋषी कपूर अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये आहेत. ऋषी कपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपण भारतात उपस्थित आहोत असे दर्शवत असतात. भारतीयांच्या आणि आपल्या चाहत्यांच्या ते नेहमीच संपर्कात असतात. बॉलिवूडपासून ते राजकारणापर्यंत सर्व विषयावर ते नेहमीच आपले मत मांडत असतात. यावेळी ऋषी कपूर यांनी एका स्टारकिडच्या बॉलिवूड डेब्यूवर वक्तव्य केलं आहे.

स्टारकिड मीजान जाफरी हा जावेद जाफरीचा मुलगा आणि दिग्गज अभिनेता जगदीप यांचा नातू आहे. मीजानचा मलाल हा सिनेमा शुक्रवारी म्हणजेच ५ जुलै रोजी रिलीज होत आहे. मीजान मलालमधून बॉलिवूड डेब्यू करत आहे. यासाठी ऋषी कपूरने मीजान जाफरीला शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट करत ऋषी कपूर म्हणतात की, “नवीन सितारा, जगदीप साहेबांचा नातू जावेद जाफरीचा मुलगा आणि तिसऱ्या पिढीचा अभिनेता मीजानला पहिला सिनेमा मलालसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुझ्यावर ईश्वराची अशीच कृपा राहो. शुभेच्छा आणि आशीर्वाद.”

ऋषी कपूर यांचं हे ट्विट सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या सिनेमात संजय लीला भंसाळी यांची भाची शर्मिन सहगल अभिनय क्षेत्रात पाऊल टाकत आहे. शर्मिन या सिनेमात मीजानसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मैरी कोम, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत यांसारख्या सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या शर्मिन सहगलचा अभिनेत्री म्हणून पहिलाच सिनेमा आहे. संजय लीली भंसाळी यांची भाची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शर्मिन सहगलला अभिनयाव्यतिरीक्त दिग्दर्शन आणि सिनेमाच्या निर्मितीचेही काम करायचे आहे असेही शर्मिनने स्वत: सांगितले आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

रक्त शुद्ध करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा

सिनेजगत

मुंबईतील पावसाचा बॉलिवूडवर देखील ‘इम्पॅक्ट’, ‘या’ चित्रपटासह इतरांना ‘फटका’

जायरा वसीमसारखे अजिबात नाहीत ‘या’ ‘टॉप’ ४ बालिवूड अभिनेत्रींचे ‘विचार’

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !