ISI | अफगाणिस्तानातील भारतीय संपत्तीला टार्गेट करा; ISI चा तालिबानी दहशतवाद्यांना निर्देश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ISI | अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी गट तालिबानमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना मागील काही वर्षात युद्धग्रस्त अफगाणिस्तानमध्ये भारताने उभारलेल्या संपत्ती टार्गेट करण्यास सांगण्यात आले आहे. हे निर्देश इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) ने दिले आहेत.

भारत सरकारने मागील दोन दशकात अफगाणिस्तानच्या पुन-र्निमिती प्रयत्नात 3 बिलियन अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. डेलाराम आणि जरांझ सलमा बंधार्‍याच्या दरम्यान 218 किलोमीटरचा रस्ता आणि अफगाण संसद भवन, ज्याचे उद्घाटन 2015 मध्ये करण्यात आले होते, अफगाणी लोकांसाठी भारतीय योगदानाचे सर्वात मोठे प्रतीक आहे.

एक अंदाजानुसार आणि इनपुटनुसार, अशरफ गनी यांच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान सरकारच्या विरूद्ध तालिबानच्या हल्ल्यांचे उघडपणे समर्थन करण्यासाठी 10,000 पेक्षा जास्त पाकिस्तान्यांनी अफगाणिस्तानमध्ये युद्धक्षेत्रात प्रवेश केला आहे. इनपुटनुसार, पाकिस्तानी आणि तालिबान दहशतवाद्यांना विशेष निर्देशांसह भारताने उभारलेल्या संपत्तीना टार्गेट करणे आणि तिथे भारतीय सद्भावनेचे सर्व संकेत नष्ट करण्यासाठी पाठवले आहे. अफगाणिस्तानची देखरेख करणार्‍या सरकारी सूत्रांनी एएनआयला ही माहिती दिली आहे.

भारताने अफगाणिस्तानमध्ये शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले होते. शिक्षक आणि सहायक कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात मोठी भूमिका पार पाडली होती. हक्कानी नेटवर्कसह पाकिस्तान समर्थक इस्लामिक दहशतवादी गट तिथे भारताच्या विरोधात अनेक वर्षांपासून सक्रिय आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

भारत या मुद्द्यावर सुद्धा संभ्रमात आहे की काबुलमध्ये आपली उपस्थिती कायम राखण्याची परवानगी दिली जाईल का, कारण आतापर्यंत अति-कट्टरपंथी इस्लामी गटांनी कोणतेही आश्वासन किंवा संकेत दिलेले नाहीत, ज्यास भारताच्या विरोधात समजले जाऊ शकते.

भारतीय एजन्सीज काबुल विमानतळावरील स्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहे,
हा विमानतळ आता जास्त काळ अमेरिकन सुरक्षेत राहणार नाही.
बगराम विमानतळासह अमेरिकेच्या ताब्यातील अनेक हवाई क्षेत्र तालिबानशी सुरू असलेल्या सत्तासंघर्षात रिकामी करण्यात आली आहेत.

सिव्हिल वर्कमध्ये असलेल्या भारतीय कामागारांना सुद्धा बाहेर जाण्यास सांगण्यात आले आहे.
भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी WAPCOS मध्ये धरण प्रकल्पातील काही अधिकारी तिथे होते.
भारताने नुकतेच काबुल शहराला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शाहतूत धरणासह जवळपास 350 मिलियन अमेरिकन डॉलरच्या कामाची घोषणासुद्धा केली होती.

Web Titel :- isi instructions to taliban fighters target the assets built by india in afghanistan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

शिवसेनेचे माजी खा. आढळराव पाटलांनी काढली खासदार अमोल कोल्हेंची ‘उंची’, म्हणाले – ‘कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा…’ (व्हिडीओ)

DGP Sanjay Pandey | काय सांगता ! होय, चक्क पोलीस महासंचालकांनी Facebook वरुन दिला Work Report

Linking Vaccine certificate to Passport | व्हॅक्सीन सर्टिफिकेट पासपोर्टशी ‘या’ पध्दतीनं लिंक करा; जाणून घ्या प्रक्रिया अन् महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे

Pune Crime | परमीटरुममध्ये जाऊन हप्ता मागणार्‍या तोतया महिला पत्रकारासह दोघांना अटक