ISIS Connection | ‘होय माझा इसिसशी संबंध’; परभणीतील 29 वर्षीय शाहीदने तब्बल 6 वर्षानंतर दिली कबुली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ISIS Connection | परभणीतील (Parbhani) 29 वर्षीय शाहिद खान (Shahid Khan) या युवकाने तब्बल सहा वर्षानंतर इसिस Islamic State in Iraq and Syria (ISIS) या दहशतवादी संघटनेशी (Terrorist Organization) संबंध असल्याची कबुली (ISIS Connection) दिली आहे. त्यामुळे विशेष न्यायालयाने (Special Court Mumbai) शाहीदला सात वर्षाची सक्तमजुरी दिली आहे. दरम्यान गुन्ह्याची कबुली देणारा हा दुसरा आरोपी आहे. यापूर्वी सिव्हील कॉन्ट्रॅक्टर नासेर बिन यफाई चाऊस (Nasser Bin Yafai Chaus) याने 6 मे रोजी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यालाही न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

महत्वाचे म्हणजे या खटल्यात एकाही साक्षीदाराने साक्ष नोंदवली नाही. तर अन्य दोन आरोपींवरील खटला सुरूच राहणार आहे. एनआयएने (NIA) शाहिद खानने केलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी अशी मागणी न्यायालयाला केली. त्यावर शाहीदने दया दाखवण्याची विनंती न्यायालयाला केली. शाहीदचे वकील म्हणाले की, शाहीदने आधीच 6 वर्षे तुरुंगात काढली आहेत. आतापर्यंत काढलेल्या कारावासातच त्याची शिक्षा पूर्ण होईल. (ISIS Connection)

एटीएसने (ATS) नासिर आणि फारुख इसिसचे सदस्य असल्याच्या आरोपाखाली 2016 मध्ये त्यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. इसिस आणि भारताने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात नासिर होता, असा आरोप एटीएसने केला आहे. नासिर हा फारुखला आयईडी (ID) बनवण्यास मदत करणार होता. आणि रमझानवेळी स्फोट करण्याचा त्यांचा विचार होता, असा आरोपही या दोघांवर एटीएसने केला आहे. त्यानंतर खान, इक्बाल, मोहम्मद रईसउद्दीन यांनाही अटक (Arrested) करण्यात आली होती.

Web Title : ISIS Connection | Parbhani youth shahid khan says yes my connection with Islamic State in Iraq and Syria (ISIS)

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त