आता पकडली गेली ISIS च्या ‘अल बगदादी’ची बहिण, सिरीयात कंटेनरमध्ये लपली होती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसचा आतंकवादी अबु बकर अल बगदादी याला यम सदनी धाडल्यानंतर आता सुरक्षा एजंसीजची नजर त्याच्या परिवारावरती आहे. याचप्रकरणी बगदादीच्या बहिणीला उत्तर सीरियामधून अटक करण्यात आली आहे.

बगदादीच्या बहिणीला घेतले ताब्यात
उत्तर सीरियामधून बगदादीची बहीण रशमिया अवद हिला एका कंटेनरमध्ये लपलेली असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. एका खाजगी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या छाप्यात बगदादीच्या बहिणीसोबत तिचा पती आणि सासू यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. तुर्कीच्या संस्था याबाबत कसून चौकशी करत आहेत.

आधी बगदादी मग आता त्याची बहीण
या आधी 27 ऑक्टोबरला अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी बगदादीला मारल्याचा दावा केला होता. ट्रम्प यांनी त्यावेळी म्हंटले होते की इडलीब येथे केलेल्या कारवाईत लष्कराकडून बगदादी मारला गेला आहे. या कारवाई वेळी बगदादी एका खोलीमध्ये होता जसे अमेरिकन सैन्याने त्यावर हल्ला केला तर तो आपल्या तीन मुलांसहित एका बोगद्यात (सुरंग) घुसला. अमेरिकन श्वान पथकाने त्याचा पाठलाग केला. चारही बाजूनी त्याला लष्कराने घेरलेले असल्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून त्याने स्वतःला गोळी मारली.

Visit : Policenama.com