‘कॉमेडियन’ सुरलीन कौरनं केलं वादग्रस्त वक्तव्य, Iskcon नं केली पोलिसात ‘तक्रार’ !हटवावा लागला ‘तो’ व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – इस्कॉन म्हणजेच इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेसनं कॉमेडीयन सुरलीन कौर आणि एंटरटेनमेंट कंपनी शेमारू विरोधात तक्रार दाखल केली आहे. मुंबईत सुरलीनच्या एका व्हिडीओवरून या संस्थेनं आक्षेप घेतला आहे. सुरलीननं एका व्हिडीओत इस्कॉन, ऋषी-मुनी आणि हिंदू धर्माच्या विरोधात टिप्पणी केली होती.

सुरलीन म्हणाली, “नक्कीच आपण सारे इस्कॉन वाले आहोत, परंतु आतून मात्र हरामी पॉर्न वाले आहोत. वरू आपण हिंदुस्तानी आहोत संस्कारी, पॉर्न आपल्यासाठी वाईट आहे. परंतु कामसूत्र ठिक आहे. धन्य आहेत आपले ऋषी मुनी ज्यांनी थोडं फार संस्कृत वापरून आपले मोठ मोठे कांड लपवले आहेत.”

इस्कॉननं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, हिंदू धर्म, सनातन धर्म, ऋषी मुनी आणि देवतांसाठी असभ्य भाषा वापरण्याची प्रवृत्ती भारतात वाढत चालली आहे. लोक सनातन धर्मातील अनुयायींच्या सहिष्णु स्वभावाचा दुरुपयोग करत आहेत. त्यांच्या शिव्या आणि अपशब्द दिवसेंदिवस वाढतच आहेत. सनातन धर्म आणि ऋषी मुनींना बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे जेणेकरून युवकांची दिशाभूल केली जाईल. टिकटॉक आणि इतर अॅपच्या माध्यमातून परदेशी ताकद आमचं चरित्र नष्ट करायला बघत आहेत जेणेकरून देशाला सहजपणे खंडीत करता यावं.

इस्कॉननं मुंबई पोलीसांकडे सुरलीन कौर आणि शेमारू विरोधात एपआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

कंपनीनं मागितली माफी
वाद वाढल्यानंतर कंपनीनं हा व्हिडीओ हटवला आहे. शेमारूनं इस्कॉनची माफी मागितली आहे. सुरलीन कौर आणि शोचे अँकर बलराज स्याल सोबत कोणतेही संबंध ठेवणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

शेमारूनं लिहिलं की, “धर्म, जाती, पंथ, संस्कृती, आम्ही इस्कॉन समुदायातील सर्व बंधु भगिणींची माफी मागतो ज्यांच्या भावना आम्ही दुखावल्या आहेत. आम्ही आश्वासन देतो की असं प्रकरण खूपच सावधानतापूर्वक आणि अत्याधिक संवेदनशीलतेनं निपटवलं जाईल.”

ही बातमी समोर आल्यानंतर ट्विटरवर #ISKCON ट्रेंड करताना दिसत आहे. अनेकांनी शेमारू आणि सुरलीनवर निशाणा साधला आहे. अनेकांनी म्हटलं आहे की, सनातन धर्माची खिल्ली उडवून फेमस होणं ही अनेक कॉमेडियन्सची फॅशन झाली आहे.