इस्लामिक देशांकडून मोदींना हरविण्यासाठी फंडिंग

रामदेव बाबांचा खळबळजनक आरोप

जोधपूर : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीवर देशाचे नाही तर संपूर्ण जागाचे लक्ष लागून राहिले आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात षडयंत्र रचले जात आहे. देशविघातक शक्तींनी भारतामध्ये इस्लामिक देशांकडून फंडिंग होत असल्याचा गंभीर आरोप योगगुरु बाबा रामदेव यांनी केला आहे.

राष्ट्रधर्माला कर्म मानून ते देशाची सेवा करतात. देशातील शेतकरी, सामान्य वर्ग, सीमेवरील जवान यांच्या भविष्यासाठी ते कम करत आहेत. अनेक विकासकामे त्यांनी देशात केली. देशातील लोकांच्या सुरक्षेसाठी नरेंद्र मोदी जगतात. मोदींनी देशाचे असे काय वाईट केले, असा सवालही रामदेव बाबा यांनी यावेळी विरोधकांना विचारला आहे. तसेच आगामी निवडणुकीत जनता पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच निवडून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

जोधपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना रामदेव बाबांनी हा आरोप केला आहे. यावेळी बोलताना रामदेवबाबा म्हणाले, देशामध्ये तसेच देशाच्या बाहेरही देशविघातक शक्ती आहे, त्यांच्याकडून लोकसभी निवडणुकीसाठी हाजारो- लाखो कोटी रुपये फंडिंग केले जात आहे. ख्रिश्चन आणि इस्लामिक देशांकडून हा सगळा पैसा भारतात येत आहे. नरेंद्र मोदी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप रामदेव बाबांनी केला.
https://twitter.com/ANI/status/1118497059668021248

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like