IS चा ‘म्होरक्या’ अबु बगदादी ‘कुत्र्या’सारखा मारला गेला, अमेरिकेच्या सैन्य हल्ल्यात 3 मुलांसह ‘खात्मा’ (व्हिडिओ)

वृत्तसंस्था : अमेरिकेच्या सैन्यांनी आतंकवादी संघटना इस्लामिक स्टेटचा (आयएस) सर्वेसर्वा अबु बक्र अल बगदादीचा खात्मा केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी याला दुजोरा दिला आहे. बगदादी सुरूंगात लपला होता त्यावेळी अमेरिकी सैन्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि बगदादीसह त्याच्या 3 मुलांचा यामध्ये मृत्यू झाल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. बगदादी कुत्र्यासारखा मारला गेला असंही ट्रम्प यांनी सांगितलं.


बगदादी हा एखाद्या भित्र्यासारखं मेला. आता जग आणखी सुरक्षित झालं आहे. बगदादीनं सुरूंगातून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही. ट्रम्प यांनी बगदादी आणि त्याला पाठिंबा देणार्‍यांचा हा मोठा पराजय असल्याचं सांगितलं आहे. बगदादी एक आजारी आणि वाईट मनुष्य होता पण आता तो नाही. तो हिंसक होता आणि हिंसेमध्येच तो मेला. रशिया, तुर्की, सिरीया, इराक आणि सिरीयाच्या समर्थकांना पाठिंबा देणार्‍यांचे डोनाल्ड ट्रम्प यांनी आभार मानले आहेत. तसेच अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा आणि सैन्याचे देखील ट्रम्प यांनी आभार मानले आहेत.