इस्लामोफोबिया : फ्रान्सविरूद्ध एकवटले आखाती देश, फ्रेंच उत्पादनांवर बहिष्कार

पॅरिस : वृत्तसंस्था – फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रों यांच्या दहशतवादासंबंधीच्या वक्तव्यावरून मुस्लिम देशांनी फ्रान्सच्या विरूद्ध आघाडी उघडली आहे. फ्रान्सच्या उत्पादनांवर बहिष्काराची मागणी जोर पकडत आहे. सौदी अरब, कुवेत, जॉर्डन आणि कतारमध्ये अनेक दुकानांमध्ये फ्रान्स निर्मित वस्तू हटवण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे, पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये सुद्धा फ्रान्सविरूद्ध आंदोलने झाली आहेत.

हटवली उत्पादने
सोमवारी तुर्कीच्या आवाहनावर अनेक आखाती देशांनी फ्रान्सच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली. कुवेतमध्ये रिटेल चेन चालवणार्‍या समुहांनी आपल्या दुकांनांमधील फ्रान्सच्या कंपनींचे प्रॉडक्ट हटवले. अरब जगतातील सर्वात मोठी इकॉनॉमी रियादमध्ये सुद्धा फ्रेंच प्रॉडक्ट्सला बॉयकाट केले, येथे रविवारी यासंबंधी हॅशटॅग ट्विटर चार्टवर दुसर्‍या नंबरवर होता.

मोठ्या नुकसानीची शक्यता
फ्रान्सविरोधी या अभियानातून फ्रान्सच्या कंपन्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. विशेषकरून ब्युटी प्रॉडक्ट बनवणार्‍या कंपन्यांचे मोठे नुकसान होईल, कारण फ्रान्सची ब्युटी प्रॉडक्ट परदेशांमध्ये महागड्या किंमतीत विकली जातात. फ्रान्स निर्मित वस्तूंची अंतरराष्ट्रीय बाजारात मोठा प्रभाव आहे. ब्युटी प्रॉडक्टसह डिजायनर कपडे आणि फ्रेंच वाईन, शॅम्पेन दुसर्‍या देशांमध्ये खुप प्रसिद्ध आहे.

सोशल मीडियावर अभियान
सोशल मीडियावर सुद्धा फ्रान्सच्या विरूद्ध अभियान चालवले जात आहे. ट्विटरवर #BoycottFrenchProducts, #BoycottFrance Products, #boycottfrance #boycott_French_products #ProphetMuhammad ट्रेंड करत आहे. याशिवाय, फेसबुक आणि व्हाट्सअ‍ॅपवर सुद्धा कॅम्पेन सुरू आहे. बहुतांश मुस्लिम देशांमध्ये फ्रेंच उत्पादनांवर बहिष्काराची मागणी जोर पकडत आहे आणि या मागणीचा परिणाम दिसू लागला आहे.

असे आहे प्रकरण
16 ऑक्टोबरला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धडा शिकवताना विद्यार्थ्यांना मोहम्मद पैगंबरांचे वादग्रस्त कार्टुन दाखवणारा शिक्षक सॅम्युअल पॅटीची गळा कापून हत्या करण्यात आली होती. यानंतर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रों यांनी त्या शिक्षकाला श्रद्धांजली अर्पण करताना या प्रकरणाला इस्लामिक दहशतवाद घोषित केले होते. तेव्हापासून मुस्लिम देशांमध्ये फ्रान्सच्या विरोधात आंदोलन होत आहेत आणि फ्रान्स प्रॉडक्ट्सवर बहिष्काराचे अभियान चालवले जात आहे.

तुर्कीने उगळले विष
तुर्कीने मुस्लिम राष्ट्रांना केलेल्या बहिष्काराच्या आवाहनाला फ्रान्स सरकारने कट्टरवादी विचारांचा परिणाम म्हटले होते आणि तुर्कीतील आपल्या राजदूताला परत बोलावले होते. खरं तर सिरिया युद्धापासूनच तुर्की आणि फ्रान्समध्ये संबंध खराब झाले होते आणि आता नार्गोनो काराबाखच्या युद्धादरम्यान सुद्धा दोन्ही देश उघडपणे एकमेकांवर आरोप करत होते.

पाकने राजदूताला बोलावले
पाकिस्तानने फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या वक्तव्यावरून फ्रान्सच्या राजदूताला बोलावले आणि आपला विरोध नोंदवला. यापूर्वी यांसंदर्भात इम्रान खान यांनी केलेल्या ट्विटला देखील फ्रान्सच्या राष्ट्रपतींना योग्य उत्तर दिले होते. बांग्लादेशात सुद्धा फ्रान्सच्या वस्तूंवर बहिष्काराचे आवाहन करण्यात आले आहे. रॅलीचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.