Islampur Crime | पोलिसाचा महाविद्यालयीन तरुणासोबत ‘डर्टी पिक्चर’, पोलीस कर्मचारी गजाआड; पोलीस दलात प्रचंड खळबळ

इस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  Islampur Crime | उच्च महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या 21 वर्षाच्या तरुणावर (college student) पोलिसानेच अनैसर्गिक अत्याचार (unnatural Act) केल्याचा धक्कादायक प्रकार इस्लामपूर येथे (Islampur Crime) रविवारी (दि.21) रात्री उशिरा समोर आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याला अटक (Police personnel arrest) करण्यात आली आहे. हा प्रकार 29 ऑक्टोबर रोजी घडला असून या घटनेची पोलीस कर्मचाऱ्याने व्हिडिओ क्लीप तयार केली. व्हिडिओ क्लीप व्हायरल करण्याची धमकी देत पोलीस कर्मचाऱ्याने पुन्हा अनैसर्गिक संभोगाची मागणी केल्यावर तुरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. आरोपीने पीडित तरुणाकडून चार हजार खंडणी (Ransom) देखील उकळली आहे.

 

हणमंत कृष्णा देवकर Hanmant Krishna Deokar (वय-34 रा. राजेबागेश्वरनगर, इस्लामपूर) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे (Deputy Superintendent of Police Krishna Pingale) यांनी सांगितले की, पीडित युवक अत्यंत सामान्य कुटुंबातील आहे.
तो सध्या उच्च महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
27 ऑक्टोबर रोजी रात्र गस्तीसाठी संयशित आरोपी देवकर आणि अन्य कर्मचारी नियुक्त केले होते.

 

पहाटे तीनच्या सुमारास पीडित युवक त्याच्या परगावच्या मैत्रिणीस भेटून आपल्या वसतिगृहाकडे जात होता.
त्यावेळी त्याला देवकर व इतर कर्मचाऱ्यांनी अडवून त्याच्याकडे चौकशी (Islampur Crime) केली.
अपरात्री फिरत जाऊ नकोस, अशी सूचना दुसऱ्या कर्मचाऱ्याने दिली आणि त्याला जाण्यास सांगितले.
त्यावेळी देवकर याने त्याचा मोबाईल नंबर लिहून घेतला होता.

 

धमकी देत पैशांची केली मागणी

 

कृष्णात पिंगळे यांनी पुढे सांगितले, दोन दिवसांनी देवकर युवकाच्या महाविद्यालय परिसरात गेला.
त्याला फोन करुन बाहेर बोलावून घेतले. तेथे मैत्रिणीच्या प्रेमप्रकरणाची माहिती दोघांच्या आई-वडिलांना देणार, अशी धमकी देऊन त्याच्याकडे पैशांची मागणी केली.
तरुणाने मित्राकडून चार हजार उसने घेऊन देवकर याला गुगल पे द्वारे (Google Pay) पैसे पाठवले.

 

शरिरसंबंधाची केली मागणी

 

हणमंत देवकर एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तुझ्या मैत्रिणीचा नंबर दे. तिला माझ्यासोबत शरीरसंबंध (physical relation) करायला सांग, असा तगादा लावला.
पीडित तरुणाने देवकरला नकार दिल्यावर त्याने पीडित तरुणाकडेच शरीरसंबंधाची मागणी केली. देवकर पीडित तरुणाला जबरदस्तीने खोलीत घेऊन गेला.
त्याठिकाणी त्याने तरुणावर अनैसर्गिक अत्याचार केले. तसेच घटनेची चित्रफीत तयार केली.

 

चित्रफित व्हायरल करण्याची धमकी

 

देवकर याने रविवारी दुपारी साडेबाराला पीडित तरुणाला फोन करुन त्याला महाविद्यालयाच्या बाहेर बोलावून घेतले.
तेथे पुन्हा संभोगाची मागणी करत चित्रफीत व्हायरल (video viral) करण्याची धमकी (Threat) दिल्याची माहिती पिंगळे यांनी दिली.

 

पोलीस अधीक्षकांकडे केली तक्रार

 

या घटनेमुळे तरुण प्रचंड मानसिक तणावातखाली आला होता. त्याने त्याच्यासोबत घडलेला प्रकार मित्राला सांगितला.
त्या दोघांनी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम (SP Dixit Gedam) आणि माझ्याशी बोलून घडल्या प्रकाराची माहिती दिली.
गेडाम यांच्या सूचनेवरुन या घटनेची फिर्याद तरुणाने दिल्यावर देवकरला अटक करण्यात आली. रात्री उशिरा हा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला.
देवकर याच्यावर अनैसर्गिक अत्याचार, खंडणी, माहिती तंत्रज्ञान कायद्यासह (Information Technology Act) धमकावल्याच्या कारणाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण (Police Inspector Shashikant Chavan) करीत आहेत.

 

हणमंत देवकर 2010 मध्ये ठाणे जिल्हा पोलीस दलात भरती झाला आहे. तेथून त्याची बदली सांगलीत झाली.
मुख्यालय आणि शहर पोलीस ठाण्यात (city police station) सेवा केल्यानंतर चार महिन्यांपूर्वी तो बदलून इस्लामपूर पोलीस ठाण्यात (Islampur police station) आला.
त्याने यापूर्वी अशी कृत्य केली असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने त्याची कसून चौकशी केली जाणार आहे.

 

Web Title : Islampur Crime | unnatural act with youth police take ransom threatening make clip viral sangli district marathi news policenama

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nashik Crime | रिसॉर्टमध्ये डॉक्टर वधुच्या ‘कौमार्य’ चाचणीचा प्रकार उघडकीस; नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Madhavi Gogate | ऑनस्क्रीन आईच्या निधनानंतर अनुपमा फेम Rupali Ganguly ला मोठा धक्का, म्हणाली – ‘खुप काही शिल्लक राहिलं’

Benefits of taking sunlight | हिवाळ्यात रोज इतकी मिनिटे घ्या सूर्यप्रकाश, अनेक आजार राहतील दूर; मिळतील 5 जबरदस्त फायदे