इस्लामपूर : फरार गुन्हेगाराच्या हल्ल्यात पोलीस हवालदार जखमी

इस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाईन

घरफोड्या, चोर्‍या, मारामार्‍या, खुनाचे प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात हवा असलेला व गेली 5 वर्षे फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारास जेरबंद करण्यात इस्लामपूर पोलिसांना यश आले आहे. मात्र त्याला पकडत असताना झालेल्या झटापटीत पोलीस हवालदार जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि.११) रात्री मार्केट यार्ड परिसरात घडली.
[amazon_link asins=’B01N4J3WAE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’10f0845c-9e45-11e8-9ae6-572314c74c55′]

बंजारा बिरज्या पवार (रा. साखराळे, ता.वाळवा) असे अटक करण्यात आलेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे.

गेले काही दिवस इस्लामपूर पोलिस बंजाराच्या अटकेसाठी प्रयत्नशील होते. पोलिस उपअधीक्षक किशोर काळे यांच्या पथकाच्या तावडीतूनही तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता. शनिवारी सायंकाळी मार्केट यार्ड परिसरातील दत्त मंदिरासमोर बंजारा याने आपली वहिनी रिटा दैवत पवार हिच्यावर खुनी हल्ला करून गंभीर जखमी केले होते. यावेळी  नागरिकांनी त्याला पकडून जबर मारहाण केली होती.
[amazon_link asins=’B0734VLDTC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1775fb2c-9e45-11e8-850a-c3b707724bd2′]

याची माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक गणेशप्रसाद भरते, हवलदार कृष्णा पवार, जितेंद्र थोरात, अनुज पाटील, प्रकाश पवार, अमोल शिंदे, गणेश शेळके यांनी घटनास्थळी धाव घेवून बंजाराला जेरबंद केले. यावेळी झालेल्या झटापटीत पोलिस कर्मचारी जितेंद्र थोरात यांच्या हाताला चाकू लागून दुखापत झाली. जखमी बंजारा याला अटक करून उपचारासाठी सांगली येथे दाखल करण्यात आले आहे.
बंजारा याच्यावर सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात सन 2007 पासून अनेक गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता. सन 2013 पासून तो फरार होता. अखेर मारामारीच्या प्रकरणातच तो पोलिसांच्या तावडीत सापडला.