‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण संस्थेला ISO नामांकन; देशाच्या पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्था म्हणून देखील प्रथम क्रमांक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ या प्रशिक्षण संस्थेला Maharashtra Guptavarta Prabodhini training institute ISO नामांकन प्राप्त झाले आहे. तर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 2019-20 चे देशाच्या पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्था Training Institute म्हणून देखील प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यात प्रमाणपत्र आणि दोन लाख रुपये बक्षीस रक्कम मिळाली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ Maharashtra Guptavarta Prabodhini या संस्थेची स्थापना 2009 मध्ये झाली आहे.
तत्पूर्वी विशेष सुरक्षा प्रशिक्षण केंद्र व विशेष शाखा प्रशिक्षण केंद्र या संस्था एकत्रित विलगीकरण करून महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी सुरू केले आहे.

राज्य गुप्तवार्ता विभागात निवड होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना येथे प्रशिक्षण दिले जाते.
महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचारी वर्गाला व्हीआयपी सुरक्षा,
गुप्तवार्ता तसेच घातपात यासह वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिले जाते.
आजपर्यंत 737 प्रशिक्षणे घेतली असून त्यातून 5 हजार 528 अधिकारी व 15 हजार 519 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

संस्थेला 2015-16 आणि आता 2019-20 देशाच्या पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्था म्हणून देखील प्रथम क्रमांक मिळाला आहे.
तर राज्य शासनाने ऊर्जा संवर्धन व व्यवस्थापन याबाबत 2014-15 चा प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
यासोबतच केंद्रीय गृहमंत्रालयाने 5 अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक म्हणूम गौरविले आहे.
संस्थेने केलेल्या या उत्तम कामगिरीमुळे संस्थेला 2021 चे आयएसओ ISO नामांकन प्राप्त झाले आहे.

राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष Ashutosh Dumbare डुंबरे यांचे मार्गदर्शनाखाली संचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक महादेव तांबडे तसेच पोलीस उपअधिक्षक अश्विनी राख, विजयकुमार पळसुले व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : ISO nomination for Maharashtra Guptavarta Prabodhini training institute Also ranked first as the best training institution in the western part of the country

हे देखील वाचा

Pune Traffic | सारसबाग येथील वाहन पार्किंगमध्ये बदल

Ayodhya Shri Ram Janmabhoomi land scam । राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा ? अजित पवार म्हणाले..

Learning licenses साठी आता RTO ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घरबसल्या मिळेल परवाना