मध्यरात्रीपासून पोलिसांची मॅरोथॉन छापेमारी, देहविक्रय करणाऱ्या १०० हून अधिक महिलांची सुटका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई पोलिसांनी मध्यरात्रीपासून मॅरेथॉन छापेमारी करत देहविक्रीसाठी ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसरातून देहविक्रय करणाऱ्या १०० हून अधिक महिलांची सुटका केली. तर अनेक दलालांना अटक केली आहे.

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा हा देहविक्रीसाठी ओळखला जाणारा परिसर आहे. या परिसरात मुंबई पोलिसांनी मध्यरात्री २ वाजल्यापासून छापेमारी सुरु केली. सकाळी सात वाजेपर्यंत सुरु असलेल्या या छापेमारीत पोलिसांनी १०० हून अधिक महिलांचा देहविक्रयातून सुटका केली. तर त्यांना देहविक्रय करण्यास भाग पाडणाऱ्या अनेक दलालांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी येथून ६ लाखांहून अधिक रक्कम जप्त केली आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली.

तर डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत कामाठीपुरा परिसरातील सिम्प्लेक्स या इमारतीमध्ये पोलीस आयुक्त रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या दलालांना व देहविक्रयाचा व्यवसाय चालविणाऱ्या महिलांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. असे पोलिसांनी सांगितले.