इस्त्राईलमध्ये आणीबाणी जाहीर ! पॅलेस्टाईन-इस्त्राईलमध्ये परस्परांवर रॉकेटचा मारा; अनेक शहरात दंगली, 32 जणांचा मृत्यु

तेलअविव : कोरोनातून मुक्त झालेल्या इस्त्राईलने हमासच्या वाढत्या हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यास सुरुवात केली असून गाजा पट्ट्यातील अनेक शहरात दंगली सुरु झाल्या आहेत. गेल्या दोन दिवस ३२ जणांचा मृत्यु झाला आहे. हमास या दहशतवादी संघटनेच्या कारवायाला प्रतिउत्तर देताना इस्त्राईलने गाजा पट्ट्यातील इमारतींवर १३० रॉकेटचा मारा केला. पॅलेस्टाईननेही त्याला प्रतिउत्तर देताना हवेतच अनेक रॉकेट नष्ट करण्यात यश मिळविले आहे. दंगलीच्या घटनांमुळे इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रात्री उशिरा इस्त्राईलमध्ये आणीबाणी लागू केली आहे.

इस्त्राईल येथील लॉडमध्ये तीन ठिकाणी दंगलखोरांनी सभास्थानांना आणि असंख्य दुकानांना आग लावण्यात आली़. किमान एक डझनभर कार जाळण्यात आल्या आहेत. लॉडचे नगराध्यक्ष यायर रेवेवो म्हणाले की, पंतप्रधानांनी शहरात आत्पत्कालीन स्थिती जाहीर करण्यास सांगितले असून दंगलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सैन्य तैनात करण्यास सांगितले आहे.

 

 

 

 

अरब व ज्यु मिश्र वस्ती असलेल्या अनेक शहरात दंगली पेटल्या आहेत. या दंगलीमध्ये आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यु झाला असून शेकडो जण जखमी झाले आहेत. या सर्व शहरांमध्ये सैनिक तैनात करण्यात आले आहे. गेल्या २ दिवसात इस्त्राईलने गाजा पट्ट्यातील पॅलेस्टाईनची वस्ती असलेल्या अनेक ठिकाणी रॉकेटचा मारा करण्यात आला आहे. त्यात अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. इस्त्राईलच्या या हल्ल्याला हमास ने प्रतिउत्तर देण्यास सुरुवात केली असून त्यांनी इस्त्राईलच्या विविध शहरात १०० रॉकेट डागली आहेत. त्यातून गाजापट्टीत युद्ध सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.