लयभारी ! तयार होतोय तब्बल 11 कोटींचा ‘शाही’ मास्क, 18 कॅरेट सोनं अन् 3600 हिर्‍यांचा समावेश

पोलिसनामा ऑनलाईन, दि. 10 ऑगस्ट : कोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत. यात प्रामुख्याने मास्क घालण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. त्यामुळे विविध प्रकारचे मास्क आपल्याला पहायला मिळत आहे. असाच एक अजब मास्क बनविण्यात आलाय तो म्हणजे, 11 कोटींचा शाही ’मास्क’. यात 18 कॅरेट सोन्यासह 3600 हिर्‍यांचाही समावेश आहे.

सध्या जगात कोरोना रुग्णांचा आकडा सुमारे 2 कोटी 26, 161 इतकी झालीय. त्यापैकी सुमारे 1 कोटी 29 लाख 625 रुग्ण बरे झाले आहेत. तर, मृतांचा आकडा सुमारे 7 लाख 34,020 वर पोहोचलीय. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्व देश लस शोधण्याच्या मागे लागलेत. यात काही देशांनी शोधलेली लस अंतिम टप्प्यात आलीय. तर रशिया देश येत्या दोन दिवसांतच लसीच्या पेटंटसाठी दावा करणार आहे, असे समजत आहे.

हि कोरोना लसची किंमतही सामान्यांना परवणारी असणार आहे, असे सांगण्यात येत आहे. ही लस बाजारात येईपर्यंत ‘डबल्यूएचओ’ने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यासाठी मास्क घालून घराबाहेर पडणे सुरक्षितेच्या दृष्टीने योग्य आहे. त्यामुळे आता बाजारातही मास्कच विविध प्रकार पाहायला मिळत आहेत. त्यात काहीजण हौशी चांदीचा तर, काहीजण सोन्याच्या मास्क तयार करत आहेत.

इस्रायल देशात दागिने तयार करणार्‍या एका कंपनीने जगातील सर्वात महागडा मास्क तयार केलाय. या मास्कची किंमत सुमारे 1.5 मिलियन डॉलर इतकी असून भारतीय किंमत ही सुमारे 11 कोटी 23 लाख 31,250 एवढी आहे. या सोन्याच्या मास्कवर हिरेही लावले आहेत.

मास्कचा डिझायनर इस्साक लेव्हीने सांगितले आहे की, 18 कॅरेट सोन्याचा हा मास्क आहे. यावर सफेद आणि काळे असे एकूण 3600 हिरे असून त्यावर एन 99चा फिल्टरही लावलाय. एका ग्राहकाच्या मागणीवर हा मास्क तयार केला आहे.