इस्त्राईलचा क्षेपणास्त्र हल्ला, 6 नागरिक ठार

जेरूसलेम : वृत्तसंस्था – इस्त्राईल आणि पॅलेस्टिन मधील तणाव वाढला असून इस्त्राईलने गाझापट्टीमध्ये आज क्षेपणास्त्र हल्ला केला त्यात सहा पॅलेस्टिनी नागरिक मृत्यूमुखी पडले.

इस्लामिक जिहाद हा पॅलेस्टिनींचा जहाल गट आणि इस्त्राईल यांच्यात गेले ४८ तास चकमकी सुरू असून या ४८ तासात ३२ जणं मृत्यूमुखी पडले आहेत.

इस्लामिक जिहादचा फिल्ड कमांडर इस्त्रायली हल्ल्यात १२ नोव्हेंबरला मारला गेला. त्यावेळी या जहाल गटाने सीमेपलीकडून बाँम्ब वर्षाव केला होता त्याला इस्त्रायली आर्मीने प्रत्युत्तर म्हणून हल्ला केला होता. गेले ४८ तास इस्त्रायली लष्कर आणि जहाल गटात चकमकी चालू आहेत. यावर इस्त्रायली लष्कराकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाँम्ब हल्ल्यात नागरिक मरण पावले असे जाहीर केले आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like