VIDEO : Gaza मध्ये Israel चा एयरस्ट्राइक, क्षणात जमीनदोस्त केली 14 मजली इमारत, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली : इस्त्रायल आणि पॅलेस्टीनमधील संघर्ष आता युद्धाचे स्वरूप घेत असल्याचे दिसत आहे. इस्त्रायल आणि पॅलेस्टीनी दहशतवादी संघटना लागोपाठ एकमेकांवर हल्ले करत आहेत. आतापर्यंत इस्त्रायली हल्ल्यात हमासच्या नियंत्रणातील गाझामध्ये मृतांची संख्या 83 पर्यंत पोहचली आहे. तर इस्त्रायलने सांगितले की, हमासच्या रॉकेट हल्ल्यात त्यांचे 7 नागरिक मारले गेले.

इस्त्रायलचा ताजा हल्ला
इस्त्रायलच्या एका ताज्या हल्ल्यात गाझायेथील एक बहुमजली इमारत क्षणात जमीनदोस्त झाली. या हल्ल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. इस्त्रायली संरक्षण दलाने म्हटले की, इमारतीमध्ये हमासचे कार्यालय होते आणि त्यांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. इस्त्रायलने हे सुद्धा म्हटले की, हल्ल्यापूर्वी इमारतीमधील लोकांना ती रिकामी करण्यास सांगण्यात आले होते आणि त्यांना पुरेसा वेळ दिला होता.

14 मजली इमारत क्षणात कोसळली
इस्त्रायलने हा हल्ला हमासच्या रॉकेट हल्ल्याच्या उत्तरादाखल बुधवारी केला होता. कतरचा न्यूज चॅनल अलजजीराने याबाबत रिपोर्ट करताना सांगितले की, या 14 मजली इमारतीचे नाव अल-शोरूक टॉवर होते. यामध्ये मीडिया हाऊसची सुद्धा कार्यालये होती. हल्ल्यानंतर हमासने इस्त्रायलवर आणखी रॉकेट हल्ल्याची धमकी दिली आहे.

 

 

 

 

कसा सुरु झाला संघर्ष?
दोन दिवसांपूर्वी येरूशलमच्या अल अक्सा मस्जिदमध्ये इस्त्रायलच्या बळाच्या वापरानंतर हमासने इस्त्रायली परिसरात शेकडो रॉकेट डागले होते. इस्त्रायलचे आयर्न डोम मिसाईल सिस्टमने मोठ्या संख्येत रॉकेट रोखली होती. परंतु अनेक रॉकेट इस्त्रायली परिसरात पडले होते. यामध्ये एका भारतीय नर्ससह तीन लोक मारले गेले होते.

हमासच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलने गाझामध्ये जोरदार एयरस्ट्राइक करून हमासच्या ठिकाणांना लक्ष्य केले. इस्त्रायली हल्ल्यात हमासचे अनेक कमांडर मारले गेले, ज्यास त्यांनी स्वता दुजोरा दिला. गाझामध्ये हल्ल्यानंतर हमासने इस्त्रायलला परिणाम भोगण्याची धमकी देत आणखी जास्त रॉकेट हल्ल्या करण्याची धमकी दिली आहे.