Israeli Technology | कोरोना झालाय की नाही, समजणार फक्त 15 सेकंदात, 15 ऑगस्टपासून भारतात ‘हे’ नवं टेक्निक येणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Israeli Technology | देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात टेस्टींग वाढवण्यात आली. परंतु कोरोनाचा अहवाल येण्यास उशिर लागत होता. मात्र, आता कोविड टेस्ट (Corona Test) अवघ्या 15-20 सेकंदात करणं शक्य होणार आहे. नमुने घेण्यापासून निष्कर्षापर्यंत, स्पेक्ट्रालिट अंस या इस्त्रायली तंत्रज्ञानाचे (Israeli technology) नाव आहे. येत्या 15 ऑगस्टपासून भारतात प्रायोगिक तत्वावर या तंत्रज्ञानाचा (Israeli Technology) वापर करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे कोरोना टेस्टींगला गती येणार आहे.

Israeli Technology | corona test medicircle health launches spectralit covid 19 test india

विविध राज्यात चाचणी

देशातील विविध राज्यात ही चाचणी करण्यात येणार आहे. थोडसं सलाईन पाणी आणि काही वेळ गुळई करायची. त्यानंतर ते पाणी एका कंटेनरमध्ये टाकयचं. यातील 2 एमएल ट्यूबमध्ये भरुन ठेवायचं. इतक्याच आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या (Artificial Intelligence) माध्यमातून कोरोनाचा निष्कर्ष अवघ्या 15-20 सेकंदात स्क्रीनवर दिसणार आहे.

असे समजेल कोरोना आहे की नाही

कोविड टेस्ट तंत्रज्ञान आणणाऱ्या इस्त्रईल कंपनीशी भारतातील मेडिसर्किलने (Medicircle)टायअप केलं आहे. मेडिसर्किलचे सहसंस्थापक डॉ. रजित शाह म्हणाले, क्यूबेटमध्ये ते नमुने भरले जातात. Cubet ट्रांन्सपेरेंट डिवाइस आहे. यामध्ये सँपल टाकून ते मशीनमध्ये टाकलं जातं. लॅपटॉपवर टेस्ट रन केला जातो. टेस्ट रनद्वारे फोटो Spectrametry लाईटच्या मदतीनं सँपल स्कॅन केले जाते. या स्कॅनिंगच्या आधारे सँपल पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे समजणार आहे.

500 रुपयांपेक्षा कमी किंमत

स्पेक्ट्रा लिट टेस्ट करण्यासाठी केवळ दोन व्यक्तींची गरज भासले. एक सँपल घेणारा आणि दुसरा लॅपटॉप सिस्टमला कमांड करणारा. या टेस्टला यूरोपियन सीई IVD ने मान्यता दिली आहे. यामुळे भारतात आयसीएमआरच्या (ICMR) मान्यतेची आवश्यकता नाही. याची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी असणार आहे. याची संसिटिविटी 95 टक्के आणि स्पेसिफिसिटी 93 टक्के आहे. नीती आयोगानेही या चाचणीचा डेमो घेतला आहे.

चाचणी व्हेरिएंट डिटेक्ट करु शकते

ईज ऑफ डूइंग बिझनेसेसचे (Ease of Doing Business) संचालक अभिजीत सिन्हा म्हणाले
की, ही चाचणी व्हेरिएंट डिटेक्ट करु शकते. मग तो कोरोनाचा कोणताही व्हेरिएंट असला तरी त्याचा
शोध घेतला जाऊ शकतो. यूरोपच्या 120 एअरपोर्टवर याच पद्धतीने कोरोनाची टेस्ट केली जाते.
कोणताही दुसरा व्हेरिएंट डिटेक्ट झाला तरी डिटेल आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या सर्वर जातो. या संपूर्ण प्रोसेसला केवळ 15 सेकंद लागतात.

हे देखील वाचा

LPG Price | दिलासादायक ! आता स्वस्तात होईल स्वयंपाक, गॅसच्या वाढत्या महागाईचे नो-टेन्शन, जाणून घ्या

Konkan Railway | कोकण रेल्वेचा प्रवास होणार ‘सुपरफास्ट’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Israeli Technology | corona test medicircle health launches spectralit covid 19 test india

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update