चूकीच्या डाएटमुळे तिचा मेंदू नेहमीसाठी झाला निकामी

पोलीसनामा ऑनलाइन – वजन कमी करण्यासाठी कुणी सांगेल ते डाएट फॉलो केले जाते. कधी-कधी विविध संकेतस्थळे, यूट्यूब, व्हॉटसअप किंवा फेसबुकसारख्या सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेऊन अनेकजण डाएट फॉलो करतात. या ठिकाणी माहिती देणारे हे तज्ज्ञ असतात अथवा नाही याची खातरजमा करता येत नाही. आणि त्यामळे अनेक गंभीर परिणामाला सामोरे जावे लागते. असाच एक प्रकार इस्त्रायलमध्ये घडला आहे. एका चाळीस वर्षीय महिलेचा मेंदू चूकीच्या डाएटमुळे कायमचा निकामी झाला आहे.

इस्त्रायल येथील एका ४० वर्षीय महिलेने तीन आठवड्यात ज्यूस डाएट केले. यामुळे त्या महिलेच्या मेंदूचे नुकसान झाले आहे. तिला तेल अवीवच्या एका मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या महिलेने डाएट सुरु करण्याआधी अल्टरनेट थेरपीची सुरुवात केली होती. या थेरपीदरम्यान महिलेला केवळ ज्यूस आणि पाणी पिण्यास सांगण्यात आले. शरीरात मिठाचं असंतुलन झाल्यामुळे तिचे वजन ४० किलो पेक्षाही कमी झाले. सध्या ही महिला हायपोनाट्रोमिया नावाच्या समस्येने त्रस्त आहे.

यास वॉटर इंटॉक्सिनेशन असे म्हटले जाते. ब्लड वेसल्समधील सोडियमचे प्रमाण कमी झाल्यानंतर ही समस्या निर्माण होते. जास्त ज्यूस डाएट घेतल्या कारणाने महिलेचा मेंदू नेहमीसाठी डॅमेज झाला आहे. सध्या तिच्या उपचार सुरु असून जास्त काळापर्यंत कुपोषण आणि जास्त तरल पदार्थांचं सेवन केल्याने महिलेच्या मेंदूला आणखी नुकसान होण्याची भिती आहे. या महिलेची शारीरीक स्थिती स्थिर झाल्यानंतरच डॉक्टरांना पुढील निर्णय घेता येणार आहे.