‘Google Map’ला टक्कर देणार भारतीय ‘नाविक’, लवकरच तुमच्या ‘स्मार्टफोन’वर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इसरो) देशातील लोकांच्या सोयीसाठी पहिला डिजिटल मॅप नाविक (Navic) तयार केला आहे. लोक हा देशी मॅप 2020 पासून क्कालकॉम प्रोसेसर असलेल्या स्मार्टफोनवर वापरू शकतील. इसरो आणि टेक कंपनी क्कालकॉमने यांसंबंधित करार केला आहे. याबरोबरच नाविक प्लॅटफॉर्म ला IRNSS तंत्राज्ञाचा सपोर्ट असेल. क्कालकॉमच्या लोकेशन बेस्ड तंत्राज्ञानाने सध्या भारताचे 7 उपग्रह काम करत आहेत. यात अगदी योग्य लोकेशनची माहिती मिळेल.

नाविक मॅपमध्ये चिपसेटचा होणार वापर
इसरो आणि क्कालकॉमच्या नेविगेशन मॅपमध्ये चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. यामुळे ही सेवा काही निवडक स्मार्टफोन आणि ऑटोमोटिव यूजर्सला उपलब्ध आहे, जर नाविक आणि स्टॅंडर्ड जीपीएस मिळून काम करतील, तर त्यात अगदी योग्य लोकेशन दाखवण्यात येईल.

इसरोचे अध्यक्ष के सिवन यांनी सांगितले की आम्ही नाविकच्या माध्यमातून देशातील विकासाची गति वाढवू इच्छित आहे. आम्ही क्कालकॉम तंत्रज्ञानाच्या मदतीने या प्लॅटफाॅर्मला तयार करण्यात आले. तसेच लोकांना देखील याचा उत्तम वापर करता येईल.

कारगिल युद्धानंतर मॅप प्लॅन तयार
1999 साली कारगिल युद्धानंतर भारताने नाविक नेविगेशन सिस्टमला तयार करण्याचा विचार केला, त्यावेळी भारताने पाकिस्तानी सैन्याची माहिती मिळवण्यासाठी अमेरिकेची मदत मागितली होती मात्र अमेरिकेने नकार कळवला होता.

जुलै 2013 पासून उपग्रह सोडण्यास केली सुरु
इसरोने नाविकसाठीचा पहिला उपग्रह आयआरएनएसएस-1ए 1 जुलै 2013 साली प्रक्षेपित केली होते. मागील 12 एप्रिलला आयआरएनएस सीरीजचा 7 वा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आले. पंरतू त्यानंतर मॅपचा वापर करुन त्यापेक्षा जास्त उत्तम माहिती मिळावी, लोकेशनल मिळावे यासाठी भविष्यात उपग्रहांची संख्या वाढवून 11 करण्याची योजना आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी