10 वी पास उमेदवारांसाठी मोठी खुशखबर ! ISRO मध्ये विविध पदांवर 182 जागांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्यांसाठी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. ISRO बंगळूर येथे विविध पदांवर 182 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवारांना हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावे लागतील. यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून 6 मार्च अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे.

पद आणि पदांची संख्या –

1. टेक्निशियन – 102 जागा –
2. ड्राफ्ट्समन – 3
3. टेक्निकल असिस्टंट – 41
4. लायब्ररी असिस्टंट – 4
5. सायंटिफिक असिस्टंट – 7
6. हिंदी टायपिस्ट – 2
7. केटरिंग अटेंडन्ट – 5
8. कुक – 5
9. फायरमन – 4
10. हलके वाहन चालक – 4
11. अवजड वाहन चालक – 5

वयोमर्यादा –
– एससी, एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट तर ओबीसी उमेदवारांसाठी 6 वर्षांची सूट आहे.
– हिंदी टायपिस्ट आणि केटरिंग अटेंडन्ट पदांसाठी उमेदवारांचे वय 18 ते 26 वर्ष दरम्यान असावे
– फारमन पदासाठी उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्ष दरम्यान असावे.
– बाकी पदांसाठी उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असावे

शैक्षणिक पात्रता –
वरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी 10 वी पास आणि त्या त्या ट्रेडमधील डिप्लोमा केलेला असावा. वाहन चालक पदांसाठी अनुभव आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अर्जदारांनी ISRO च्या वेबासाइटला भेट द्यावी.

शुल्क –
उमेदवाराला आपला अर्ज भरून झाल्यावर ऑनलाइन पद्धतीने आपले परिक्षा शुल्क भरावे लागेल. हे परिक्षा शुल्क 250 रुपये आहे. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, माजी सैनिक, ईडब्लयू आणि महिला यांना कोणत्याही प्रकारचे परिक्षा शुल्क भरावे लागणार नाही.

वेतनमान –
निवड झालेल्या उमेदवाराला 18,000 ते 44, 900 रुपयांदरम्यान वेतमान देण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण –
बंगळूर

येथे करा अर्ज –
अर्ज करण्यासाठी उमेदवार https://www.isro.gov.in/ या वेबसाइटला भेट देऊ शकतात. या वेबसाइटवर अर्जदाराला भरतीबाबत अधिक माहिती मिळेल.