‘इस्त्रो’कडून ‘चांद्रयन 2’नं पहिल्यांदाच ‘कैद’ केलेले पृथ्वीचे फोटो ‘रिलीज’, पहा ‘अव्दितीय’ क्षण !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांना चांद्रयान-२ मध्ये एकापाठोपाठ एक यश मिळत आहे. चांद्रयान-२ पृथ्वीच्या पुढील कक्षात प्रवेश केला आहे. त्यात चांद्रयान-२ ने पहिल्यांदा पृथ्वीचे अदभुत आणि रोमांचक फोटो पाठवले आहेत. पृथ्वीचे हे फोटो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

Chandrayaan 2 ने भेजी पृथ्वी की पहली तस्वीर, देखें धरती के अद्भुत नजारे

इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार चांद्रयान-२ ने हे फोटो LI4 कॅमेऱ्यातून टीपले आहेत. या फोटोंमध्ये पृथ्वी निळ्या रंगात दिसत आहे. युनिव्हर्सल वेळेनुसार हे फोटो १७ वाजून ३२ मिनिटांनी काढले आहे.

Chandrayaan 2 ने भेजी पृथ्वी की पहली तस्वीर, देखें धरती के अद्भुत नजारे

२२ जुलैला भारताने चांद्रयान-२ चे प्रक्षेपण केले होते. त्यानंतर २ ऑगस्टला दुपारी ३ वाजून २७ मिनिटांनी चांद्रयान-२ च्या कक्षेत चौथ्यांदा यशस्वीपणे बदल केले. त्यानंतर आता ६ ऑगस्टपर्यंत पृथ्वीच्या चारही बाजूंना चांद्रयान-२ चे ऑर्बिट बदलण्यात येणार आहे.

Chandrayaan 2 ने भेजी पृथ्वी की पहली तस्वीर, देखें धरती के अद्भुत नजारे

२२ जुलैला लॉन्ट केलेल्या या चांद्रयान- २ ची यात्रा ४८ दिवसांची आहे. यात चांद्रयान हे २२ जुलै ते ६ ऑगस्ट पृथ्वीच्या कक्षेत फिरणार असून १४ ते २० ऑगस्टमध्ये चंद्राकडे जाणाऱ्या लांब कक्षेत प्रवेश करत यात्रा करणार आहे.

Chandrayaan 2 ने भेजी पृथ्वी की पहली तस्वीर, देखें धरती के अद्भुत नजारे

२० ऑगस्टनंतर चांद्रयान-२ चंद्राच्या कक्षेत पोहचेल. त्यानंतर पुढील ११ दिवस चंद्राच्या कक्षेत फिरणार आहे. त्यानंतर १ सप्टेंबरला विक्रम लॅंडर ऑर्बिटर चांद्रयानापासून वेगळे होत चंद्राच्या दक्षिणी ध्रुवाकडील प्रवास सुरु करणार असल्याची माहिती इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी दिली आहे.

Chandrayaan 2 ने भेजी पृथ्वी की पहली तस्वीर, देखें धरती के अद्भुत नजारे

आरोग्यविषयक वृत्त –