सर्वप्रथम मी ‘भारतीय’, त्यानंतर ‘तमिळ’, ISRO चे प्रमुख के. सिवन यांनी लोकांची मनं जिंकली (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  रॉकेटमन म्हणून ओळख मिळणारे इसरोचे प्रमुख डॉ. के सिवन यांची सध्या खूप चर्चा होत आहे. पंतप्रधान मोदींनी देखील त्यांच्या प्रतिभेची वाहवाह केली. आता के. सीवन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची लोक चर्चा करत आहे. या व्हिडिओमध्ये इसरोच्या प्रमुखांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले की, मी सर्वात आधी एक भारतीय आहे. ही त्यांची प्रतिक्रिया सोशल मिडियामध्येे चर्चेचा विषय बनली आहे. सध्या हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

जानेवारी  2018 मध्ये एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा सिवन यांना पत्रकाराने विचारले की, तमिळ असलेले तुम्ही आज एका मुख्य हुद्यावर आहात, तमिळनाडूच्या लोकांना काय संदेश देऊ इच्छितात. त्यावर उत्तर देताना सिवन म्हणाले की, मी सर्वात आधी भारतीय आहे, मी भारतीयाच्या रुपात इसरोमध्ये सहभागी झालो आहे. ते म्हणाले की इसरो अशी जागा आहे की तेथे प्रत्येक राज्यातील आणि विविध भाषा असलेले लोक काम करतात.परंतू माझे कौतूक करणाऱ्या बांधवांचे मी ऋणी आहे. 
 
इसरोच्या प्रमुखांचे कौतूक –
या व्हिडिओनंतर ट्विटरवर लोक के. सीवन यांचे कौतूक करत आहेत.  हैद्राबादमधील एका यूजरने लिहिले की, मी पहिले भारतीय आहे. या तुमच्या उत्तराने तुम्ही सर्वांचे मन जिंकले, परंतू एक प्रश्न आहे की जेव्हा पीव्ही सिंधू भारताचा गौरव जगात वाढवते, त्यावेळी त्यांच्या राज्यातील लोक त्यांची क्षेत्रीय ओळखीवर जोर देतात, यातून आपण कसे बाहेर पडावे?

एक यूजर म्हणाला – सर तुमचा आभिमान वाटतो.

एका यूजरने म्हणले की, इसरो प्रमुख डॉ. के. सिवनच्या उत्तरात सर्वात आधी पहिले मी भारतीय आहे मग तमिळ या प्रतिक्रियेमुळे तुमचा गर्व वाटतो. तर एका यूजरने लिहिले की, सिवन सर तुम्ही तुमच्या कामाप्रती अत्यंत इमानदार आहेत.