ISRO नं रचला ‘इतिहास’, देशाचा सर्वात ‘शक्तिशाली’ संचार उपग्रह ‘जीसैट – 30’ लॉन्च !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ संशोधन करणाऱ्या इस्रो या संस्थेने शुक्रवारी युरोपीय अंतराळ एजन्सीद्वारे एरियन – 5 प्रक्षेपण यानाच्या माध्यमातून संचार उपग्रह जीसॅट – 30 चे लॉंचिंग केले आहे. भारतीय वेळेनुसार 2 वाजून 35 मिनिटांनी जीसॅट – 30 चे एरियन – 5 द्वारे लॉंचिंग करण्यात आले.

जीसॅट – 30 इनसॅट – 4 ए ची जागा घेणार आहे. त्यामुळे आता याच्या कव्हरेज क्षेत्रामध्ये वाढ होणार आहे. इनसॅट – 4 ए ला 2005 मध्ये लॉंच केले गेले होते. त्याचे वजन 3357 किग्रॅ आहे. हा उपग्रह केयू बँडमधील भारतीय मुख्य भूभाग आणि बेटांना सी बँडमधील खाडीतील देश, मोठ्या संख्येने आशियाई देश आणि ऑस्ट्रेलिया यांना कव्हरेज प्रदान करतो. हा भारताचा 24 वा उपग्रह आहे, ज्याला एरियन स्पेसच्या एरियन रॉकेटने प्रक्षेपित केले आहे.

असे सांगितले जात आहे की 30 वर्षांचा मिशन कालावधी असलेला जीसॅट उपग्रह डीटीएच, टेलिव्हिजन अपलिंक आणि व्हीसॅट सेवांसाठी कार्यरत असलेला महत्वाचा उपग्रह आहे.

कसा होईल फायदा इस्रोने केले स्पष्ट
इस्रोने सांगितले की, जीसॅट – 30 कम्युनिकेशन पेलोड गको विशेष अंतराळ यानात जास्तीत जास्त ट्रान्सपोंडर ठेवण्यासाठी विशेष स्वरूपात तयार केले गेले आहे. त्यानुसार, व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सर्व्हिसेस, डिजिटल सॅटेलाइट न्यूज आर्काइव्हिंग (डीएसएनजी), डीटीएच दूरदर्शन सेवा इत्यादींसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like