Video : अक्षय कुमारच्या ‘मिशन मंगल’च्या टीजरवर ISRO म्हणतं, ‘एक देश एक स्वप्न’ इंडिया ‘स्पेस सुपरपॉवर’ बनणार

मुंबई : पोलीसनामा ऑनालाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट मिशन मंगलचा टीजर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार वैज्ञानिक राकेशची भूमिका साकारताना दिसणार आहे. सोशल मिडियावर चित्रपटाच्या टीजरला प्रेक्षकांनी खूप पसंत केले आहे. या चित्रपटावर आता ISRO (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गेनाइजेशन) ची पण प्रतिक्रिया आली आहे.

मिशन मंगल का पोस्टर

इस्त्रोच्या ऑफिशियल इन्टाग्राम हॅंडलवरून अक्षय कुमारच्या पोस्टवर कमेंट करताना लिहले की, ‘एक देश एक स्वप्न’ इंडिया स्पेस सुपरपॉवर बनणार आहे. ‘चंद्रयान २’ चे स्वप्न पुर्ण होण्यासाठी खूप कमी दिवस राहिले आहे. इस्त्रो १४ जुलैला ‘चंद्रयान २’ लॉंच करणार आहे. त्याचबरोबर अक्षय कुमारचा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. ‘

मिशन मंगल चित्रपट जगन शक्ति यांनी डायरेक्ट केला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त तापसी पन्नू, विद्या बालन, शरमन जोशी, कीर्ति कुल्हारी, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन आदी कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट मिशन मंगल ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे. यामध्ये मिशनची सत्य कथा दिसून येणार आहे.

सोशल मिडियावर अक्षयने खुलासा केला होता की, हा चित्रपट तो आपल्या मुलीसाठी करणार होता. १५ ऑगस्ट दिवशी बॉक्स ऑफिसवर तीन चित्रपट एकमेकांना टक्कर देणार आहे. त्याचदिवशी साऊथचे सुपस्टार प्रभासचा ‘साहो’ आणि जॉन अब्राहमचा चित्रपट ‘बाटला हॉउस’ प्रदर्शित होणार आहे.

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

बीट खाल्याचे ‘हे’ चमत्कारिक फायदे ; ‘खुंटते कॅन्सरग्रस्त कोशिकांची वृध्दी’, जाणून घ्या

लहान मुलांना दुधीदात येत असताना होणाऱ्या त्रासावर करा ‘हे’ ५ उपाय