ISRO | इस्रोला मोठा झटका ! EOS-3 सॅटेलाइट लॉन्च; अखेरच्या क्षणी क्रायोजेनिक इंजिनमध्ये बिघाडाने मिशन ‘फेल’

श्रीहरीकोटा : ISRO | अंतराळातील भारताचा सीसीटीव्ही असे म्हटले जाणारे व संपूर्ण देशासह सीमांवर नजर ठेवणारे सॅटेलाईट घेऊन जाणार्‍या अग्निबाणाच्या क्रायोजेनिक इंजिनमध्ये शेवटच्या क्षणी बिघाड झाल्याने आज इस्त्रोचे (ISRO) इओएस ३ अर्थ ऑब्झरवेशन सॅटेलाईट (EOS-3) मशीन फेल झाले़ हा इस्त्रोसहीत भारताला मोठा झटका बसला आहे.

या उपग्रहाचे ठरलेल्या वेळेनुसार सकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी यशस्वीपणे उड्डाण झाले. परंतु, पहिले दोन टप्पे पार केल्यानंतर तिसर्‍या टप्प्यात तांत्रिक कारणामुळे ते अयशस्वी झाले.

इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन (ISRO President K. Siwan) यांनी ट्विट करुन सुरुवातीला रॉकेटचे यशस्वी उड्डाण झाल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर हे रॉकेट पृथ्वीशी कक्षा ओलांडू शकले नाही. अंतराळातच त्याचा स्फोट होऊन ते नष्ट झाले. त्यानंतर इस्त्रोचे अध्यक्ष के सिवन म्हणाले की, क्रायोजेनिक स्टेजमध्ये तांत्रिक विसंगती दिसून आली आणि मिशन पूर्ण होऊ शकले नाही.

अर्थ ऑब्झरवेशन सॅटेलाईट ३ चे जियोसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हीकल एफ १० द्वारे लाँच करण्यात
आले. हे रॉकेट ५२ मीटर उंच आणि ४१४.७५ टन वजनाचे होते. त्यात तीन स्टेज होते. या रॉकेटची
२५०० किलोग्रामपर्यंतचे सॅटेलाईट अंतराळात पोहचविण्याची क्षमता होती. इओएस -३ सॅटेलाईटचे
वजन २२६८ किलोग्राम होते. अंतराळात गेल्यानंतर हा ३६ हजार किलोमीटरवर स्थिर होणार होता. इस्त्रोने आतापर्यंत ३६ हजार किलोमीटरवर कोणताही उपग्रह सोडला नव्हता.

हे सॅटेलाईट दिवसभर दर अर्धा तासाने संपूर्ण भारताची छायाचित्रे घेणार होता. त्याच्या गरजेनुसार
वैज्ञानिक ही छायाचित्रे अन्य मंत्रालयांना देऊन त्यांच्या कामासाठी ते उपयोग करु शकले असते.

हे देखील वाचा

Pune Rural Police | अट्टल गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध, एमपीडीए कायद्यान्वये कारवाई

PWC INDIA | ‘पीडब्ल्यूसी इंडिया’ची पुढील 5 वर्षात 1,600 कोटी रुपयांची गुंतवणूक, 10,000 आणखी नोकर्‍या निर्माण करणार; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  isro launch gslv f10 eos 03 eyes space satish dhawan space centre sriharikota

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update